बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जानेवारी 2018 (09:34 IST)

बीट कॉइन प्रमाणे आता रिलायन्सची क्रिप्टोकरन्सी जिओ कॉइन

मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यामध्ये आता जिओद्वारे मोबाइल सेवा क्षेत्रात मोठा धुमाकूळ घातल्यानंतर अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता ‘क्रिप्टोकरन्सी’ क्षेत्रात काम सुरु करत आहे. अंबानी लवकरच ‘जिओ कॉइन’ बाजारात दाखल करत आहेत. तर दुसरीकडे पूर्ण जगात ‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ने  खळबळ उडवली असतांना अंबानी स्वतःचा जिओ कॉइन बाजारात दाखल करत आहेत. यामध्ये बिटकॉइन वर्षभरातच  भाव हजारो डॉलर्सने वाढला आहे. आता  याच प्रकारात आता भारतीय कंपनीचे स्वत:चे ‘कॉइन’ येण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम अंतर्गत मुकेश अंबानी यांचे मोठे सुपुत्र आकाश अंबानी यांच्याकडे ‘जिओ कॉइन’ची सूत्रे असणार आहेत. या कामासाठी त्यांनी  ५० तरुण तज्ज्ञांची टीम तयार केली आहे,  या ‘जिओ कॉइन’ अंतर्गत ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकसित केरण्यात येणार आहे. त्याचे  अ‍ॅप असून त्याचा उपयोग मोबाइलमधील स्मार्ट कॉन्टॅक्ट्स व लॉजिस्टिक्स व्यवस्थापनासाठी करता येणार असून. मात्र दुसरीकडे आरबीआय आणि   केंद्र सरकारने गुंतवणूकदारांना ‘क्रिप्टोकरन्सी’पासून सावध राहण्याची सूचना दिली आहे. जगात बिटकॉइनला कोठेही मान्यता नाही त्यामुळे त्यात गुंतवणूक आणि त्यातील नफा नुकसान कोणतीही जबाबदारी कोणताही देश आणि सरकार घेत नाही.