1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (17:18 IST)

स्कोडाची चालढकल मालकाने कार ओढली गाढवा सोबत

ग्राहक देव असून त्याची सेवा करा असे आपण मानतो तर अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांची खूप काळजी घेतात.मात्र काही वाऱ्यावर सोडतात.तसाच प्रकार घडला लुधियाना  येथे.
 
वारंवार खराब होणा-या कारची तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने वैतागलेल्या कारमालकाने गाढवांना आपली 25 लाखांची कार खेचायला लावली आहे. लुधियानामधील ही घटना आहे. या व्यक्तीकडे स्कोडा कंपनीची ऑक्टेव्हिया कार होती. गाडीत रोज होणा-या बिघाडामुळे ते त्रस्त झाला होते. अनेकवेळा त्यांनी आपली कार सर्व्हिस सेंटरला नेली होती, पण तरीही त्यांच्या समस्येचं निरासन झालं नव्हतं. 
 
 त्रस्त झालेल्या कारमालकारने कारला दोन गाढव बांधून खेचायला लावले आहेत. यावेळी त्यांनी गाढवांचं नामकरण करत त्यांना स्कोडा नाव देऊन टाकलं आहे. ही बातमी आता पूर्ण देशात पसरली असून त्यामुळे आतातरी बदनामी होवू नये म्हणून स्कोडा काम करेल का ? आय कडे सर्वांचे लक्ष आहे.