सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जून 2023 (21:04 IST)

नाशिक शहर परिसरात पुन्हा एकदा आयकर विभागाने धाडसत्र

income tax
नाशिक : नाशिक शहर परिसरात पुन्हा एकदा आयकर विभागाने धाडसत्र राबविले आहे. शहरात चार ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकल्याचे समजते. यावेळी पुन्हा एकदा बांधकाम व्यावसायिक आयकरच्या रडारवर आहेत. त्यासोबतच काही शेअर मर्चँट आणि चार्टर्ड अकाऊंटट, फायनान्शिअल सर्व्हिसेस यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते.
 
काही महिन्यांपूर्वी शहरातील ५ बिल्डर्सच्या विविध ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे एखच खळबळ उडाली होती. राज्याच्या विविध भागातून आलेल्या आयकरच्या पथकांनी बिल्डरांच्या निवासस्थाने, घरे, फार्म हाऊस आणि अन्य ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकले होते. या छाप्यात आयकरला मोठ्या प्रमाणात बेहिशोबी संपत्ती आढळल्याचे बोलले जाते. यासंदर्भात आयकर विभागाने अद्याप अधिकृत माहिती उघड केलेली नाही. त्याचदरम्यान, गेल्या महिन्यात सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका उद्योगावरही आयकरने छापा टाकला होता. आता पुन्हा आयकर विभागाने शहरात छापासत्र सुरू केले आहे. आयकर विभागाची ५० जणांच्या १० टीम शहरात दाखल आहेत. बुधवारी सायंकाळी हे पथक नाशकात दाखल झाले. हवाला व्यवहार आणि काळ्या पैशाचे अनेक बेकायदेशीर व्यवहार यासंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. नक्की किती ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
Edited by : Ratnadeep Ranshoor