गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2017 (14:48 IST)

लवकरच 200 रुपयांची नोट व्यवहारात येणार

केंद्र सरकार लवकरच 200 रुपयांची नोटही व्यवहारात आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँककडून 200 रुपयांच्या नोटेचं छपाईकाम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत आणि सुलभ होण्याच्या हेतून 200 रुपयांची नोट आणणार असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. मार्चमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान आरबीआयनं 200 रुपयाची नोट व्यवहारात आणण्याचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागला होता. पण, आता 200 रुपयाची नोट व्यवहारात आल्यानंतर मोठा दिलासा मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.