शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (18:44 IST)

SBI Alert: ग्राहकांना केले सावध, या चुकीमुळे अकाउंट होऊ शकतात रिकामे

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बैंक ऑफ इंडिया (State Bank of India) ने आपल्या खातेधारकांना सोशल मीडियाचे सर्तकतेने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ट्वीट करुन आपल्या ग्राहकांना सावध केले आहे आणि सोशल मीडियाचा सतर्कतेने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ग्राहकांना अपील केली आहे की ते सोशल मीडियावर कोणत्याही अफवा, चुकीची माहिती आणि फेक मेसेजेसवर विश्वास करु नये आणि यावर विश्वास ठेवून माहिती शेअर करु नये.
 
SBI ने ट्वीट करत म्हटले की सोशल मीडियावरील फेक मेसेजवर विश्वास केल्याने फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे फ्रॉड स्वत:ला बँक अधिकारी सांगत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवता. कधी केव्हायसी तर कधी स्कमीच्या नावाखाली फसवणूक होत आहे. अशात लोक आपली खाजगी माहिती शेअर करतात आणि अकाउंट पूर्ण रिकामे होतं.
 
एसबीआईने असे फसवणारे कॉल किंवा मेसेजपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची अपील केली आहे. बँक वेळोवेळी लोकांना सोशल मीडियाद्वारे अशा फसव्या लोकांना कसे टाळायचे ते सांगत असते. अशा कोणत्याही फ्रॉडपासून बचावासाठी कधीही कोणत्याही बँक खात्यासंबंधी माहिती शेअर करु नये. कधीही आपलं OTP शेअर करु नये. तसेच रिमोट अॅक्सेस अॅप्लीकेशनपासून वाचले पाहिजे. कोणासोबतही आपल्या आधाराची कॉपी, आयडी पासवर्ड शेअर करु नये.