शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

एसबीआय कार्ड धारकांना इंधन सरचार्ज नाही

क्रेडिट कार्ड देण्यात देशातील दुसर्‍या क्रमांकावर असणारी भारतीय स्टेट बॅंकेच्या (एसबीआय) उपयोग कर्त्यांना आता 400 ते 3000 रूपयांपर्यंत इंधन भरल्यास फ्युअल सरचार्ज द्यावा लागणार नाही.

एसबीआयने आज काढलेल्या पत्रकात त्यांनी ही माहिती दिली.

आत्तापर्यंत पेट्रोल पंपचालक क्रेडिट कार्डद्वारे पेट्रोल भरणार्‍यांकडून सामांन्यत: 2.5 टक्यांपर्यंत फ्युअल सरचार्ज घेत होते. योजनेनुसार इंडियन ऑईल व आयबीपी पेट्रोल पंपांवर इंधन खरेदी केल्यास क्रेडीट कार्ड वर कोणताही सरचार्ज लागत नव्हता. आता ही योजना देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर लागू होणार आहे.