विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा..! 22 ऑक्टोबर रोजी 'वाघाची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग

Theater
Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (15:55 IST)
जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने ‘वाघाची गोष्ट’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे.
मार्च 2020 पासून टाळेबंदी आणि इतर अनेक निर्बंधामुळे महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांचे प्रयोग जवळजवळ ठप्प झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही एकत्र येत आपली कला सादर करता येत नव्हती. मात्र आता हे निर्बंध शिथिल केल्याने
दि. 22 आक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सावित्रीबाई फुले पुण विद्यापीठ मधील नामदेव सभागृह येथे ललित कला केंद्र विस्तार कार्यक्रमांतर्गत ‘वाघाची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आलेला आहे.
मूळ इटालियन भाषेतील हे नाटक दारिओ फो या नोबेल पुरस्कार विजेत्या नाटकाकाराने लिहीलेले असून त्याचा मराठी अनुवाद विनोद लव्हेकर यांनी केलेले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन महेश खदारे यांनी केलेला आहे. तर शुभम साठे आणि ऋत्विक तळवलकर हे या नाटकात अभिनय करत आहेत. नाटकाचा कालावधी एक तास आहे.

या प्रसंगी महाराष्ट्रातल्या नाटकघरांची सुरवात म्हणून तिसरी घंटा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार देणार आहेत. शासन नियमांनुसार सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. सदर विनामुल्य नाटयप्रयोगाचा जास्तीत जास्त रसिकांनी अस्वाद घ्यावा असे आवाहन ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रविण भोळे यांनी केले आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

श्री दत्तक्षेत्र कडगंची

श्री दत्तक्षेत्र कडगंची
औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर अशी पवित्र दत्तस्थाने सगळ्यांनाच परिचित आहेत, पण त्याशिवायही ...

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता

मराठी जोक : तो सिनेमा मी आधी पहिला होता
दिनेश- काल मी माझ्या बायको ला माझ्या ड्रॉयव्हर बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने

BBM3 - बिगबॉस मराठी च्या घरात हुकुमशहांची आव्हाने
सध्या मराठी कलर्स वर रियालिटी शो बिगबॉस मध्ये आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई या ...

तीर्थक्षेत्र जेजुरी

तीर्थक्षेत्र जेजुरी
जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक शहर आहे. हे खंडोबाच्या ...

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण

‘अहमदनगर महाकरंडक’१२ जानेवारीपासून असा करा अर्ज पूर्ण माहिती
अहमदनगर : राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, मराठी-हिंदी ...