1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (12:14 IST)

IND vs ENG: अजिंक्य रहाणेला टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकाचा पाठिंबा, म्हणाले -तो लवकरच पुन्हा आपला खेळ दाखवेल

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात फलंदाजी अनुकूल खेळपट्टीवर रहाणे एकही धावा न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधी, लॉर्ड्स कसोटीत केलेल्या मौल्यवान धावा आणि पुजारासोबतची भागीदारी याशिवाय रहाणेच्या बॅटमधून धावा निघाल्या नाही. रहाणेवर त्याच्या खराब कामगिरीमुळे आता जोरदार टीका होत आहे. मात्र, या टीकेनंतरही टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षकानीं आपल्या कसोटीच्या उपकर्णधाऱ्यांचे समर्थन केले आहे. 
 
त्यांनी म्हटले आहे की, रहाणे सध्या वाईट टप्प्यातून जात आहे आणि सध्या संघाला त्याची फारशी चिंता नाही. ते म्हणाले की, चाहत्यांना अजिंक्य रहाणे लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये येईल,अशी आशा आहे. जसे चेतेश्वर पुजाराने मालिकेत पूर्वी केले होते.लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी रोमांचक वळणावर पोहोचली आहे.भारताने आपल्या दुसऱ्या डावात 466 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने बिनबाद 77 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे, इंग्लंड आता लक्ष्य पासून 291 धावा दूर आहे.भारताने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या, त्याला उत्तर म्हणून इंग्लंडने 290 धावा केल्या आणि 99 धावांची आघाडी घेतली.
 
चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत प्रशिक्षक म्हणाले, 'यावेळी काळजी नाही. मी आधी म्हटल्याप्रमाणे, जेव्हा तुम्ही इतका वेळ क्रिकेट खेळता, तेव्हा तुमच्याकडेही असे टप्पे असतील जिथे तुम्हाला धावा मिळणार नाहीत. ही एक वेळ आहे जेव्हा एक संघ म्हणून तुम्हाला त्यांचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. आम्ही त्याला पुजारासोबत अधिक संधी मिळवताना पाहिले आणि नंतर तो परत आला, त्याने आमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. आम्हाला आशा आहे की अजिंक्य देखील फॉर्ममध्ये परत येईल आणि आपल्याला माहित आहे की तो अजूनही भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये प्रमुख भूमिका बजावतो. म्हणून, मला वाटत नाही की आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे ते चिंतेचे कारण बनले पाहिजे.