भारतीय महिला क्रिकेट संघाचे T20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघ सलग सातव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऍशले गार्डनरने दोन बळी घेतले. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.यापूर्वी 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 मध्येही संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. ऑस्ट्रेलियन संघ 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये चॅम्पियन बनला होता. त्याचबरोबर भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत चौथ्यांदा पराभूत झाला आहे. यापूर्वी 2009, 2010, 2018 मध्येही संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली. एलिसा हिली आणि मुनी यांनी पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. त्याने हिलीला यष्टिरक्षक रिचाकडून यष्टिचित केले. हीली 25 धावा करू शकला. यानंतर मुनीने लॅनिंगसोबत दुसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली.
173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताने सलग तीन षटकांत तीन विकेट गमावल्या होत्या. भारताच्या डावातील दुसऱ्याच षटकात शेफाली वर्मा बाद झाली. सहा चेंडूंत नऊ धावा करून ती बाद झाली. यानंतर स्मृती मंधानाला ऍशले गार्डनरने एलबीडब्ल्यू आऊट केले. मेगन शूटने धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्माला पायचीत केलं.
तिने तातडीने रिव्ह्यू घेतला पण पंचांनी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला. तिने 9 धावा केल्या.
शैलीदार फलंदाज स्मृती मानधनाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. तिने 2 धावा केल्या. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू असताना धाव घेण्याचा यात्सिका भाटियाचा प्रयत्न फसला. तिने चार धावा केल्या.
33/3 अशा स्थितीतून जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी संघाला तारलं. या दोघींनी 41चेंडूत 69 धावांची भागादारी रचली.
दोघींनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दहाव्या षटकात भारताने 93 धावांची मजल मारली.
उत्तम सूर गवसलेल्या जेमिमाने उसळत्या चेंडूला बॅट लावण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपरच्या हातात जाऊन विसावला.जेमिमाने 24 चेंडूत 6 चौकारांसह 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
जेमिमा बाद झाल्यानंतर काही षटकं खेळ मंदावला पण हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांनी 26 चेंडूत 35 धावांची भागीदारी केली.
हरमनप्रीतने 34 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
हरमनप्रीत बाद झाली तेव्हा भारताला जिंकायला 40 धावांची आवश्यकता होती. डार्सी ब्राऊनने ऋचा घोषला बाद करत भारताला अडचणीत टाकलं. पण यानंतर स्नेह राणा आणि दिप्ती शर्माने भारताच्या आशा जिवंत ठेवल्या. पण ऑस्ट्रेलियाने सातत्याने विकेट्स मिळवत बाजी मारली. डार्सी ब्राऊन आणि अॅशले गार्डनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्याऑस्ट्रेलियाने बेथ मूनी, कर्णधार मॅग लॅनिंग आणि अष्टपैलू अॅशले गार्डनरच्या दमदार खेळींच्या बळावर 172 धावांची मजल मारली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी 52 धावांची खणखणीत सलामी दिली. हिली 25 धावा करुन तंबूत परतली.
बेथ मूनीने 37 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 54 धावांची आक्रमक खेळी केली. लॅनिंग-गार्डनर जोडीने चौकार आणि एकेरी-दुहेरी धावांची सांगड घातली. लॅनिंगने 34 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 49 धावांची खेळी केली. गार्डनरने 18 चेंडूत 5 चौकारांसह 31 धावा कुटल्या.
बेथ मूनीला 32 वर जीवदान मिळालं तर लॅनिंग एकवर खेळत असताना तिचा झेल सुटला. या दोघांनी जीवदानाचा फायदा उठवत मोठी खेळी केली.
भारतीय संघाकडून अनुभवी शिखा पांडेने 2 तर दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
बेथ मुनीचं वेगवान अर्धशतक
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर बेथ मुनीने वेगवान अर्धशतकी खेळी केली. तिने सुरुवातीपासून संयमी खेळी करून एक बाजू सांभाळून धरली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर मुनीने धावांचा वेग वाढवला.
मुनीने 37 चेंडूंमध्ये 54 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार तर एका षटकाराचा समावेश आहे.
सलामीवीर बेथ मुनीला ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगची चांगली साथ मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या लॅनिंगने 34 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. तिने 4 चौकार तर 2 षटकार खेचले
सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी होता. त्यांचा संघ दीडशेच्या आतच रोखला जाईल, असं वाटत असताना अॅशले गार्डनर फलंदाजीला आली.
गार्डनरने शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. तिने 5 चौकारांच्या मदतीने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
अखेर, निर्धारित 20 षटकांत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 172 धावांचा डोंगर उभारला.
भारताकडून गोलंदाज शिखा पांडेने 2 विकेट घेतले. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन तिला साथ दिली.
Edited by - Priya Dixit