शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (19:00 IST)

जेईई मेन 2021: या 7 टिप्स परीक्षेत यश प्राप्तीसाठी मदत करतील

जेईई मेन ही देशातील सर्वात मोठी स्पर्धात्मक अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा पैकी एक आहे. दरवर्षी, आयआयटी मध्ये प्रवेश घेण्याचं लक्ष ठेवणारे लाखो विद्यार्थी जेईई मेन देण्यासाठी उपस्थित असतात.  नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) जानेवारी महिन्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) घेते. पहिला प्रयत्न जानेवारी मध्ये आणि दुसरा प्रयत्न एप्रिल मध्ये घेण्यात येतो. टॉप जेईई मेन रँक धारकांना जेईई ऍडव्हान्स परीक्षा द्यावी लागते जी  प्रतिष्ठित भारतीय व्यवस्थापन संस्था(IIM)चे प्रवेश द्वार आहे.
मात्र यंदाच्या वर्षी कोवीड -19 च्या प्रादुर्भावामुळे JEE मेन एप्रिल परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. JEE एप्रिल परीक्षेचे सुधारित वेळापत्रक पुढील महिन्यापर्यंत NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. या दरम्यान विद्यार्थिनी JEE मेन च्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणे करून परीक्षेत अव्वल स्थान मिळावे. आम्ही सांगत आहोत असे काही महत्त्वाचे मुद्दे जे विद्यार्थींना JEE मेन परीक्षा क्रॅक करण्यास आणि उत्कृष्ट गुण मिळविण्यात मदत करतील.
 
1 अभ्यासक्रम किंवा सिलॅबस तपासा- 
NTA ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर JEE परीक्षेसाठी सिलॅबस जाहीर केले आहे आणि परीक्षेमध्ये विचारले जाणारे बहुतेक प्रश्न त्यावर आधारित आहे. म्हणून विद्यार्थींना परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर नवीन आणि अपडेट अभ्यासक्रम किंवा सिलॅबस तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.
 
2 पेपर पॅटर्न आणि मार्किंग योजना -
आता प्रवेश परीक्षाचा पेपर पॅटर्न, प्रश्नांचे प्रकार, मार्किंग स्कीम, प्रश्नांचा वेटेज इत्यादींची माहिती घेणे देखील आवश्यक आहे.  
 
3 आपल्या अभ्यासाच्या साहित्याची तपासणी करा-
जेईई परीक्षेच्या तयारीसाठी सर्वात योग्य अभ्यास साहित्य म्हणजे इयत्ता 11 वी आणि 12 वीची पाठ्यपुस्तके या व्यतिरिक्त, सरावासाठी मागील काही वर्षाचे प्रश्नपत्र, मॉक टेस्ट इत्यादी समाविष्ट आहे.  
 
4 आपल्या मान्यतेला किंवा संकल्पनेला स्पष्ट करा -
सर्वप्रथम आपल्या सर्व मान्यतेला आणि संकल्पनेला स्वच्छ करा, अन्यथा आपण आपला संपूर्ण वेळ त्या प्रश्नांमध्ये मध्ये वाया घालवाल. जर आपल्या संकल्पना स्पष्ट आहे, तर आपण परीक्षेत विचारले जाणारे कोणत्याही जटिल प्रश्नांसाठी प्रयत्न करू शकता.
 
5 आपला अभ्यास आणि तयारीचा आनंद घ्या- 
आपल्याला परीक्षेच्या तयारीचा आणि परीक्षेचा सकारात्मकरित्या आस्वाद घ्या. जर आपण परीक्षा ओझं म्हणून घेता तर आपला तणाव वाढतो.
 
6 आत्म-विश्लेषण -
आपले सामर्थ्य आणि कमकुवत पणा जाणून घेण्यासाठी आपण सराव केलेल्या अध्यायांमधून मॉक टेस्ट सोडविण्याचा प्रयत्न करा. आपले क्षेत्र सुधारण्यासाठी मॉक टेस्ट मध्ये आपल्या केलेल्या कामगिरीचे विश्लेषण करा. हे आपल्याला येणाऱ्या जेईई मेन परीक्षे साठी आपला वेग आणि अचूकता करण्यात मदत करेल.  
 
7 ऑनलाईन मॉक टेस्ट घ्या-
जेईई परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित टेस्ट मोड(सीबीटी मोड) मध्ये ऑनलाईन घेण्यात येईल. विद्यार्थींना वेळेवर ऑनलाईन पेपरचा  प्रयत्न करण्याचा अनुभव घेण्यासाठी ऑनलाईन मॉक टेस्ट घेतला पाहिजे.          
अशा पद्धतीने अभ्यास केल्यास आपल्याला यश प्राप्ती नक्कीच मिळेल.