मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (13:56 IST)

भारतात कामगार दिन केव्हापासून साजरा केला जातो

Labor Day
भारतात लेबर किसान पार्टी ऑ‍फ हिंदुस्तान या पार्टीच्या वतीने 1 मे 1923 रोजी या मे दिनाचा पहिला उत्सव चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. या कामगार दिनाचे प्रतीक असलेला लाल ध्वज देखील भारतात तेव्हाच प्रथम वापरण्यात आला होता.
 
या पक्षाचे नेते सिंगारावेलु चेतियार यांनी मे डे उत्सव दोन ठिकाणी आयोजित केले होते- एक म्हणजे मद्रास उच्च न्यायालयासमोर समुद्रकिनार्‍यावर व दुसरे ट्रिप्लिकेन बीचवर.
 
नंतर त्यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले व त्यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांसाठी प्रासंगिक सुट्टी जाहीर करण्याचा ठराव येथे पारित करण्यात आला. त्याचबरोबर या सभेत पक्षाच्या अहिंसक तत्त्वांचे स्पष्टीकरण देणारे इतर काही मुद्दे, जगातील कामगारांना काही आर्थिक मदतीसाठी व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विनंतीवर देखील चर्चा झाली.
 
याच्या तीन वर्षानंतर फ्रेंच समजावादी पार्टीने देखील कामगार चळवळीचा व गवत बाजार येथील नरसंहाराचे स्मारक म्हणून एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून निवडले
 
कम्युनिस्ट व समाजवादयी राजयकीय पक्षांच्या कामगार जळवळींना हा दिवस जोडला गेला आहे. कामगार दिनाला हिंदीमध्ये कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस, मराठीत कामगार दिवस व तामिळमध्ये उझीपल्लार नाल म्हणून ही ओळखले जाते.
 
त्याचप्रमाणे 1960 साली भाषेच्या आधारावर गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमा ठवल्या जाऊन ही दोन राज्ये स्वतंत्र झाली. तो दिवस 1 मे च असल्याने एक मे हा दिवस गुजरात दिन व महाराष्ट्र दिन म्हणून देखील ओळखला जातो.