शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

गर्दीत केवळ दोनच चेहर्‍यांची ओळख

गर्दीमध्ये असताना माणूस एका वेळी फक्त दोन चेहर्‍यांनाच ओळखू शकतो. त्यातही लोकप्रिय व्यक्तींचा चेहरा असणे महत्त्वाचे आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
ईस्ट लंडन विद्यापीठाच्या संशोधकांनी यासंदर्भात एक प्रयोग केला आहे. त्यात गर्दीमधील चेहरा ओळखण्याच्या माणसाच्या क्षमतेचा अभ्यास करण्यात आला. प्रोगामध्ये सहभागी असलेल्यांना लोकप्रिय व्यक्तींचा चेहरा ओळखण्यास सांगण्यात आले. त्यात टोनी ब्लेअर, बिल क्लिंटन, पॉप स्टार मिक जॅगर, रॉबी विल्यम्स यांचा गर्दीमध्ये समावेश होता. उर्वरित चेहरे परिचित नव्हते. प्रयोगात सहभागी लोकांना संगणकाच्या स्क्रीनवर विचलित करणार्‍या चेहर्‍याकडे दुर्लक्ष करण्याची सूचना देण्यात आली होती. परिचित चेहरा या पडद्यावर गर्दीच्या   मधोमध उभ्या रांगेत ठेवण्यात आला होता. चेहर्‍याच्या एक किंवा दोन अवयवांवरून एखाद्याचा चेहरा किंवा प्रतिमा दुरून ओळखता येऊ शकत नाही. माणसाकडे तेवढी क्षमता नसल्याचे या प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. पहिल्या प्रयोगात गर्दीमध्ये मध्यस्थानी प्रसिध्द अधिक व्यक्ती ठेवण्यात आल्यानंतर त्यात मिक जॅगरला शोधून काढणेदेखील मनाचा गोंधळ उडवणारे ठरल्याचे अनेक सहभागी लोकांनी सांगितले. तुलनेने गर्दीत वरच एकदम कडेला असलेला चेहरादेखील व्यक्तीला चटकन ओळखता येत नाही. त्याकडे आपोआप दुर्लक्ष होते, असे संशोधकांना प्रोगात आढळून आले.