शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

पाच हजार वर्षांपूर्वीही होते 'फेसबुक'!

PR
सध्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्‍सचा बोलबाला आहे. इसवी सनापूर्वी तीन हजार या काळात म्हणजे कांस्ययुगातील लोकही अशाच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधत होते, असे संशोधकांनी म्हटले आहे. त्यांनी 'फेसबुक'च्या प्रागैतिहासिक काळातील नमुना शोधल्याचा दावा केला आहे.

रशिया आणि स्विडनमध्ये ग्रॅनाईटच्या खडकांवरील चित्रे पाहिल्यानंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका पथकाने याबाबतचा दावा केला. ही ठिकाणे म्हणजे सोशल नेटवर्किंग साईटचा प्राचीन नमुना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चित्रांच्या माध्यमातून ते आपले विचार आणि भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत होते. एकमेकांच्या सहयोगावर शिक्कामोर्तब करीत होते. सध्या 'फेसबुक'वर जसे 'लाईक' केले जाते तशातलाच हा भाग होता. मार्क सापवेल या संशोधकांने याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, ही ठिकाणे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या ठिकाणी त्या काळातील लोक अशासाठी गेले कारण तेथे त्यांच्या आधीचे लोक गेले होते हे त्यांना माहिती होते. आधुनिक माणसासारखे त्या काळातील लोकही नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहण्याची इच्छा करीत होते. सुरुवातीच्या समाजातील ही इच्छा अशा माध्यमातून व्यक्त होत होती. रशियातील जालावरूगा आणि उत्तर स्विडनमधील नामफोरसेनमध्ये अशी सुमारे अडीच हचार चित्रे आहेत. त्यात प्राणी, माणसं, नौका आणि शिकारी दले रेखालेली आहेत.