शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

फेसबुक फोटोवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव

तुम्ही फेसबुक अँडीक्ट असाल.. प्रत्येक दिवशी तुमच्या मित्रांचे बदललेले प्रोफाईल फोटोही पाहात असाल तर आता तुम्ही तुमच्या मित्रांना जास्त चांगल्या पद्धतीनं ओळखूही शकता. तेही केवळ प्रोफाईल फोटोच्या माध्यमातून.. तुम्ही म्हणाल कसं बरं शक्य आहे हे? सोशल नेटवर्किगच्या जमान्यात आपण सोशल नेटवर्किग वेबसाईटवर जे काही शेअर करतो, लाईक करतो त्या सगळ्या गोष्टी आपली मानसिकता आणि व्यक्तिमत्त्वाशी साधम्र्य दाखवणार्‍या असतात.
 
‘युनिव्हर्सिटी ऑफ मिसोरी’च्या एका अभ्यासानुसार, फेसबुकवर आपले लाईक्स, प्रोफाईल फोटो आणि इतर काही गोष्टी आपल्या मानसिक स्थितीचा अंदाज दर्शवतात. त्यामुळे फेसबुकवर जर तुम्ही आता एखाद्या नव्या व्यक्तीला भेटत असाल तर त्याच्या प्रोफाईल फोटोच्या आधारे तुम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेऊ शकता. पोट्रेट प्रोफाईल फोटो म्हणजेच एखादा असा फोटो जो डोक्यापासून कंबरेपर्यंत असेल आणि त्यात चेहरा व्यवस्थित दिसून येईल. असे लोक सामान्य व्यवहार करणारे आणि आत्मविश्वासपूर्ण असतात. ज्या फोटोंमध्ये खांद्यापासून वरपर्यंत चेहर्‍याचा क्लोजअप फोटो असेल असे लोक आत्मकेंद्रित असू शकतात.