शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या मंदिरात पती-पत्नी सोबत नाही करू शकत पूजा

मंदिरामध्ये दंपतीने सोबत पूजा करणे शुभ मानले जाते. पण देवभूमी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे दुर्गा देवीचे एक असे मंदिर आहे जिथे पती-पत्नीसोबत पूजा करू शकत नाही.
 
असे मानले आहे की जर दंपतीने या मंदिरात जाऊन दर्शन केले तर त्यांना शिक्षा भोगावी लागते. हे मंदिर श्राई कोटी माता या नावाने पूर्ण हिमाचलमध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिर पती-पत्नी जातात पण एकाचे दर्शन घेणे झाल्यावर दुसरा दर्शनाला जातो.
 
शिमलाच्या रामपूर येथे समुद्र तळापासून 11000 फूट उंचीवर देवी दुर्गाचे एक स्वरूप विराजमान आहे जे श्राई कोटी माता नावाने प्रसिद्ध आहे. माता भीमाकाली ट्रस्ट याचे संचालन करत असून शतकांपासून हे मंदिर लोकांच्या आस्थाचे केंद्र आहे.
 
यामागील कारण: एका कहाणीप्रमाणे महादेवाने आपल्या दोन्ही मुलांना अर्थातच गणेश आणि कार्तिकेय यांना ब्रह्मांडाची प्रदक्षिणा लावायला सांगितले. कार्तिकेय तर आपल्या वाहनावर बसून भ्रमण करायला निघून गेले परंतु गणपतीने आपल्या आई-वडिलांची प्रदक्षिणा घालून म्हटले की यांचा चरणांमध्येच ब्रह्मांड आहे. आणि इकडे कार्तिकेय ब्रह्मांडाचा चक्कर लावून परतेपर्यंत गणपतीचा विवाह संपन्न झाला होता. यामुळे क्रोधित होऊन त्याने कधीही विवाह न करण्याचा संकल्प घेतला.
 
कार्तिकेयच्या या निर्णयामुळे देवी पार्वतीला राग आला होता आणि त्यांनी म्हटले की येथे जे कोणी दंपती त्यांचा दर्शनासाठी येतील ते एकमेकापासून दुरावतील. यामुळे येथे पती-पत्नी एकमेकासोबत पूजा करत नाही.