शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

सहवासानंतर नाराला मारून खाणारी कोळी मादी

WD
ओर्ब वेब नावाच्या प्रजातीमधील कोळ्यांमध्ये अजब प्रकार पाहायला मिळतो. यामधील नाराला मादी लैंगिक संबंधानंतर चावून खाऊन टाकते. नरही अशा वेळी आनंदाने आपले बलिदान देतो. हा प्रकार नंतर जन्माला येणारी त्यांची संतती आरोग्यसंपन्न असण्यासाठी केला जात असावा, असे संशोधकांना वाटते.

जर्मनीच्या हॅम्बुर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ओर्ब वेब एजिर्योप ब्रूनिची प्रजातीमध्ये ही कोळी मादी संबंधांवेळीच नराला पकडून ठेवते जेणेकरून नंतर त्याला खाऊन टाकता येईल. केवळ तीस टक्के नरच अशा तावडीतून सुटू शकतात. अशा नरांपैकी निम्मे नंतर दुसर्‍या मादीकडे आकर्षित झालेले आढळून आले, तर उर्वरीत नर पहिल्याच मादीकडे पुन्हा आकर्षित झाले.

संबंधांनंतर आपला जीव जाऊ शकतो, हे माहित असूनही प्रजोत्पादनासाठी हे नर असे धाडस करती असतात.