गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मराठी दिन
Written By वेबदुनिया|

मायबोली

- मनोहर धडफळे

'मराठी असे आमुची मायबोली वृताही बढाई सुकार्याविणे !' असंनुसतं धोकून अथवा लिहून मरा‍ठीचा प्रचार-प्रसार होईल ही कल्पना मुळातच चुकीही आहे. ये देश माझा आहे ही भावना मातृभाषेचा वापर वाढविल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाहीं. आपले जीवन वैभवशाली व सामर्थ्यसंपन्न बनविण्यासाठीकेवळ मातृभाषाच उपयोगी ठरते.

मराठी भाषा सक्षम आहे. समर्थ आहे. इतकेच नव्हे तर श्रेष्ठ आहे, हे निर्विवाद सत्य आहे. चित्रलिपि सारखी अत्यंत अप्रगत व कठीण लिपि असून सुद्धा जपानने आपली मातृभाषा व लिपी सोडली नाही. असे असूनसुद्धा ते जगातील अतिशय प्रगत व सामर्थ्यसंपन्न राष्ट्र म्हणून जगापुढे वावरते आहे. परंतु आम्ही मात्र आमची मराठी भाषा, आमची लिपी शास्त्रशुद्ध, वैज्ञानिक आणि चांगली असून सुद्धा तिला टाकून देऊन इंग्रजी सारख्या वैचित्र्य असलेल्या परकीय भाषेचा, वापर करण्याचा, तिला कवटाळून बसण्याचा अट्टहास करीत आहोत.

शब्दात असलेल्या अक्षराचा उच्चार न होणे उदा: (Psycho) किंवा शब्दांत नसलेल्या अक्षराचा उच्चारण होणे उदा: (COLONEL उच्चारण 'कर्नल'), एकाच अक्षराचे अनेक उच्चार होणे (CH चा उच्चार कुठे च. कुठे क तर कुठे 'श' ) BATCH (च) PSYCHO (को) PARACHUTE (शू) U चा उच्चार कुठे अ (BUT) तर कुठे उ (PUT) हे फक्त इंग्रजीतच शक्य आहे. या उलट मराठीत च च ज ज व झ झ 'ह्या' अक्षरांचे दोन वेगवेगळे उच्चार असून ही ते शास्त्रशुद्ध आहेत. त्यांच्या उच्चारांत आपल्या जीभेची हालचाल वेगवेगळीहोते. (तालव्य व दन्तमूलीय उच्चार ) शब्द भांडार मोठे असणे हेच केवळ श्रेष्ठ भाषेचे लक्षण मानणे चुकीचे आहे.

मोजक्या शब्दांत मोठा गहन विषय अचूकपणे व्यक्त करणे हेच श्रेष्ठ भाषेचे लक्षण होय. या दृष्टीने मराठी भाषा स्वयंपूर्ण आहे. मराठी भाषेचे व्याकरण हे सव्यसाची आहे. प्रत्यय, मात्रा यांचा उपयोग करून एकाच शब्दाचा हवा तो अर्थ झटपट काढण्याचे कसब या व्याकरणाने मिळवून दिले आहे. त्याच्याशी तुलना केल्यास इंग्रजी ही ठोकळेबाज भाषा आहे.

मराठी भाषेत 1. श्रेष्ठता 2. सुलभता 3. शुद्धता 4. सुसंगती 5. तर्कशुद्धता 6. गतिमानता एवढे गुण सामावलेले आहेत. या करिताच मराठीचा, मायबोलीचा प्रचार-प्रसार करण्याकरिता मराठी माणसाने झटले पाहिजे, वेळ आल्यास झगडले पाहिजे. हेच सुकार्य जाणावे.