लॉकडाऊनमध्ये मोठी सरकारी भरती : केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

Last Modified शुक्रवार, 3 जुलै 2020 (15:38 IST)
स्टाफ सिलेक्शन कमिशनने हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी भरती काढली आहे. यानुसार 283 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून पगार डोळे दिपावणारा मिळणार आहे.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 25 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या 283 पदांपैकी 275 पदे ही
केंद्र सरकारच्या
मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनिअर ट्रान्सलेटर/ज्युनिअर हिन्दी ट्रान्सलेटर या जागा आहेत. तर 8 पदे ही सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी आहेत.

एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे.

पहिल्या पेपरमध्ये हिंदी आणि इंग्रजीतील 1 मार्कचे 100-100 असे 200 प्रश्न असणार आहेत. तर दुसऱ्या पेपरमध्ये निबंध आणि पत्रलेखन असणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे बंधनकारक आहे.
पगार किती?
ज्युनिअर ट्रान्सलेटर आणि ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 6 नुसार पगार दिला जाणार आहे. यासाठी पगार 35400 ते 112400 रुपये असणार आहे. तर सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 7 नुसार पगार दिला जाणार आहे. हा पगार 44900 ते 142400 रुपये असणार आहे.

अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसींना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर SC/ST/Women/PwD/ESM उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
लॉकडाऊनमध्ये मोठी सरकारी भरती
IBPS RRB Recruitment मध्ये जवळपास 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर स्टेट बँकेनेही पुढील सहा महिन्यांत
2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू काश्मीर बँकेने 1850 जागांची भरती प्रक्रिया राबविली आहे. लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. जम्मू कश्मीर बँकेनेही 1850 जागांसाठी भरती आयोजित केली असून या साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. जम्मू कश्मीर बँकेद्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या बँकेमध्ये बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर (Bank PO) ही पदे भरली जाणार आहेत.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

पावसाळ्यात कच्चं सॅलड खाण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या ...

पावसाळ्यात कच्चं सॅलड खाण्याने होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या योग्य पद्धत..
सॅलड किंवा कोशिंबीर खाणं खूप फायदेशीर व ते स्वादामध्ये देखील चविष्ट असते. प्रत्येक मोसमात ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील ...

वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट..
वयाच्या 50शी नंतर अधिक प्रमाणात प्रथिनं घ्या, स्नायू राहतील बळकट. सरत्या वयात आहारात अधिक ...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...

चष्म्यावरील स्क्रॅच काढण्याचा सोप्या टिप्स जाणून घेऊ या...
चष्म्यावर स्क्रॅच पडल्यास नवीन चष्मा खरेदी करण्याची गरज नाही, या सोप्या टिप्स ने स्क्रॅच ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, ...

Benefit Of Black Tea : आरोग्यासाठी फायदेशीर आहे ब्लॅक टी, जाणून घ्या 7 फायदे..
जगभरातील चहाप्रेमींची कमतरता नाही. चहाचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार त्यांचा फायद्यासाठी ...

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..

फळांच्या रसाचे हे घरगुती उपचार खरंच आपणांस माहीत नसणार..
फळांचे रस आरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे, पण हे आपणांस क्वचितच ...