Indian Oil Corporation Ltd Recruitment : नोकरीची सुवर्ण संधी, त्वरा अर्ज करा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने ज्युनिअर इंजिनिअर असिस्टंट पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 16 पदांसाठी ही भरती केली जात असून अर्ज करण्याची शेवटली तारीख १९ फेब्रुवारी २०२१ आहे. अधिकृत वेबसाईटवर
iocrefrecruit.in ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
एकूण पद- 16
अर्ज भरण्याची तारीख - २८ जानेवारी २०२१ ते १९ फेब्रुवारी २०२१
लेखी परीक्षेची अपेक्षित तारीख - २८ फेब्रुवारी २०२१
निकाल जाहीर होण्याची तारीख - ९ मार्च २०२१
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससीची पदवी असणे आवश्यक.
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत.
अनुसुचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर जास्तीत जास्त वय २६ वर्षे यामध्येच असावे.
ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त वयात ३ वर्षे
एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयात ५ वर्षे
विशेष: प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना त्यांच्या अनुभवाच्या बरोबरीने जास्तीत जास्त वयात सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे.
या प्रकारे करा अर्ज
होमपेजवर दिलेल्या Recruitment लिंकवर क्लिक करा
पुढील टॅबवर पुनर्निर्देशित 'Redirect' केले जाईल
'Apply now' या बटनावर क्लिक करा
सूचना व्यवस्थितरीत्या वाचून संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरुन 'Next' बटणावर क्लिक करा
अर्ज व्यवस्थित तपासून 'Submit' करा.