शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By आरती देशपांडे|
Last Modified: बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (20:11 IST)

फिटनेसच्या क्षेत्रात संधी

फिटनेसचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय. सकाळी सकाळी धावायला जाणारी, जीममध्ये जाण्याच्या लगबगीत असणारी, योगा क्लासची तयारी करणारी अनेक माणसं तुम्ही पाहिली असतील.

वेगवेगळ्या फॅड डाएट्‌सबद्दलही तुम्ही ऐकलं असेल. म्हणूनच तुम्ही फिटनेसच्या क्षेत्रात करिअर करू शकता. फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी तुम्हाला स्वतःला फिटनेसची विशेष आवड असणे गरजेचे आहे.
 
तुम्हाला फिटनेसचे महत्त्व असायला हवे. फिटनेस ट्रेनर बनण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची गरज असतेच असे नाही पण फिटनेसबाबतचे काही अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. 

इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट
ऑफ फिजिकल एज्युकेशन अ‍ॅंड स्पोर्टस्‌ सायन्स, नवी दिल्ली, लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यासारख्या संस्थांमधून शारीरिक शिक्षणासंबंधीचे अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करू शकता. यासह फिटनेसविषयक अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था देशात आहेत. 
 
डाएट अ‍ॅंड न्यूट्रिशनचाअभ्यासक्रमही तुम्ही करू शकता. या क्षेत्राचा सखोल अभ्यास करण्याची तयारी असेल तर पीएचडीही करता येईल. या क्षेत्रात संधींची अजिबात कमतरता नाही. फिटनेसचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. त्यातच शहरी भागात जीवनशैलीशी संबंधित विकारांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याकडे लक्ष देण्याचे प्रमाण बरेच वाढताना दिसत आहे. तरूणांमध्येही फिटनेसबाबत जागरूकता वाढताना दिसते आहे. सरकारी तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळू शकतात. पुरेशा अनुभवानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम करता येईल. फिटनेस ट्रेनर म्हणून तुम्ही वेगवेगळ्या भूमिका पार पाडू शकता