1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (15:10 IST)

थंडीत फॅशनेबल राहताना...

थंडीत स्टायलिंगसोबतच शरीराला ऊबही मिळायला हवी. म्हणूनच या दिवसात प्लेड कोट आणि पश्मिना शालीसोबत एक्सपरिमेंट करू शकता. थंडीत काय कॅरी करता येईल याविषयी...
 
* पश्मिना शाल जीन्ससोबत कॅरी करता येईल. फिक्या रंगाची पश्मिना शाल तुमची स्टाईल स्टेटमेंट ठरू शकेल. या शालीमुळे थंडीपासून तुमचं रक्षण होईल. शिवाय तुम्ही स्टायलीशही दिसाल. ही शाल वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करून फॅशनमधलं वैविध्य जपता येईल.
* तुमच्या साध्या पेहरावाला चार चाँद लावण्यात काम मफलर करू शकतात. मफलरहीवेगवेगळ्या पद्धतीने कॅरी करता येतील. जॅकेट किंवा कार्डिगॅनसोबत मफलर गुंडाळा. प्रिंटेड शर्ट किंवा टीशर्टसोबत गडद रंगाचे मफलर कॅरी करता येतील.
* थंडीत थ्री पीस सूट किंवा जॅकेट कॅरी करणार असाल तर छानसं पॉकेट स्वेअर विकत घ्या.
* थंडीत तुमच्याकडे प्लेड कोट असायला हवा. फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही ऑकेजन्सना ते कॅरी करता येईल. पार्टी किंवा फंक्शनसाठी ते बेस्ट आहे.
* डबल ब्रेस्टेड कोट हासुद्धा चांगला ऑप्शन आहे. नेव्ही ब्लू, काळ्या किंवा ग्रे रंगाचे कोट उठून दिसतात. असे कोट छाप पाडून जातात. तुमचं व्यक्तिमत्त्वही यामुळे खुलतं.
* बंदगळा हा ऑल टाइम हिट ऑप्शन आहे. निळी डेनिम किंवा कुर्त्यासोबत तो कॅरी करता येतो. बंदगळ्यासोबत तुम्ही बरेच प्रयोग करू शकता. न्यूट्रल रंगामध्ये बंद गळ्याची निवड करा. 
प्राजक्ता जोरी