फॅशन करायला वयाचे बंधन नाही.

fashion edit
Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (09:00 IST)
असं म्हणतात की वयोवृद्ध लोकांनी किंवा वय झालेल्या लोकांनी फॅशन करू नये. परंतु सध्याच्या आधुनिक आणि बदलत्या काळात या.जुन्या
आणि बुरसटलेल्या विचारांना काहीच अर्थ नाही.आजची जीवनशैली म्हणते की फॅशनेबल असण्याच्या वयानुसार काहीच संबंध नाही.वयाच्या 60 व्या वर्षी देखील बायका असं फॅशन करतात जे त्यांना वयाच्या 30 व्या वर्षी करायला पाहिजे.आता या गोष्टीची चेष्टा कोणी करत नाही. उलट सगळे कौतुक करतात की या वयात देखील किती चांगले राहतात, किती चांगले ड्रेस घातले आहे.
फॅशन करण्यासाठी देखील काही गोष्टी लक्षात ठेवायचा असतात जेणे करून कोणी टिंगल टवाळी करू नये. चला तर मग जाणून घेऊ या.
* व्यक्तिमत्त्वाला साजेशा पोशाख घाला-
फॅशन ट्रेंड मध्ये राहण्यासाठी वयाची काही मर्यादा नाही. मोठ्या वयाचे लोकं देखील फॅशन ट्रेंड सह फॅशन करायला घाबरत नाही. त्यांच्या वर कपडे चांगले दिसतील त्याला साजेसं आपले आहार, मेकअप कडे देखील योग्य लक्ष देतात. सरत्या वयात देखील लोकं पूर्ण आत्मविश्वासाने फॅशनेबल आऊटफिट्स घालतात.
आऊटफिट्सचं नव्हे तर त्याच्या रंगाला घेऊन देखील सहज असतात. लक्षात घेण्यासारखे असं की आपण जे काही घालाल त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व छानं दिसायला पाहिजे. या साठी वेळेनुसार आणि वातावरणानुसार पोशाख निवडावे.

* गडद कपड्यामुळे वय लपत नाही-
बऱ्याच लोकांचे मत आहे की गडद कपडे घातल्यामुळे वय लपते. असं काही नाही.फॅशनेबल आऊटफिट घालताना असा विचार करू नका की वय लपवायचे आहे. आपण बिनधास्त होऊन सहजपणे फॅशनेबल आऊटफिट घाला.सर्वात महत्त्वाचे म्हणजे की मेकअप, वातावरण आणि ड्रेसच्या दरम्यान एक साम्य असावे. अन्यथा आपण हसण्याचे कारण बनू शकता.एखाद्या शैलीची कॉपी करण्याऐवजी स्वतःचा स्टाईल बनवा. जेणे करून आपण गर्दीमध्ये देखील वेगळे दिसाल.

* स्वतःला मेंटेन करा-
जर आपल्याला फॅशनेबल आऊटफिट्स घालायचे आहे तर या साठी स्वतःला मेंटेन करा.वेळीच केस कापणे,नखे कापणे त्यांना शेपमध्ये ठेवणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की सरत्या आणि वाढत्या वयात दातांची निगा राखणे देखील महत्त्वाचे आहे. त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या. शरीर फिट तर सर्व फिट असं म्हणतात. या साठी निरोगी राहा, शरीरानुसार वर्कआउट करा. असं केल्यानं तंदुरुस्त राहत जे आपल्या व्यक्तिमत्त्वाला सुधारण्याचे काम करत. ट्रेंडी आऊटफिट्स घालण्यासह आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष द्या. जेणे करून तरुण लोकांना देखील आपल्याला बघून प्रेरणा मिळेल.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका

कोरोनाची 5 नवी लक्षणं, घाबरु नका पण दुर्लक्षही करु नका
देशात कोरोनाने पुन्हा थैमान मांडला आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत ...

हृदयामध्ये राम - सीता

हृदयामध्ये राम - सीता
रावणाशी युद्ध जिंकल्यानंतर श्रीरामाने त्या सर्वांना भेटवस्तू दिल्या ज्यांनी युद्धात ...

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा
सहनशील व धैर्यवान सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या ...

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल

मुलांना दररोज खायला द्या हे पदार्थ, हुशारी दिसून येईल
मुलांनी प्रगती करावी अशी इच्छा सर्व पालकांना असते अशात त्याच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष ...

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची

चलती वेगन सौंदर्यप्रसाधनांची
कोरोनामुळे बर्याच गोष्टी बदलल्या आहेत. लग्नसोहळे कमी खर्चात आणि मोजक्या पाहुण्यांच्या ...