जेव्हा प्रत्यक्ष श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते

jejuri 600
Last Modified बुधवार, 8 डिसेंबर 2021 (15:57 IST)
एकदा श्रीसमर्थ रामदास स्वामी पुरंदर किल्ल्यावरून चाफळला जाताना जेजुरी वरून चालले होते. तेवढ्यात एक धनगर, घोड्यावरुन समर्थांसमोर आला. त्याने समर्थांचे दर्शन घेतले व म्हणाले, "महाराज खंडोबाच दर्शन घेवून जाना." तेव्हा समर्थ हसून म्हणाले, "अरे बाबा, मी रामाचा सेवक आहे. मी रामा व्यतिरिक्त इतरांना राम स्वरूपातच पाहतो. तुझ्या खंडोबाला इथूनच नमस्कार करतो. आता गड चढायला मला जमणार नाही."


त्यावर तो धनगर म्हणाला, "अहो महाराज, तुमच्या रामाने प्रत्येक वेळी शिवलिंग स्थापून शिवाची मनोभावे पूजा केली त्या रामाच्या दैवताला तुम्ही दर्शन घेणार नाही म्हणता, हे जरा अचंबित करणारे आहे". हे त्या धनगराच्या मुखातील शब्द ऐकून समर्थ चमकले. मनात विचार केला, ही माझ्या रामाची आज्ञा दिसत आहे. हे पाहून नाईलाजाने धनगराच्या घोड्यावर बसून वर जेजुरी गडावर आले. त्यावर धनगर म्हणाला, "महाराज, तुम्ही दर्शन घ्या. मी घोड बांधून येतो."

समर्थ मंदिरात गेले तिथे खंडोबाचे लिंग पाहून महाराजांचे मन प्रसन्न झाले. त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. अंगाला कंप सुटला. वाणी सद्गदित झाली आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले,

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥

सुरवरसंवर वर दे मजलामी देवा ।
नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥

रघुवीरस्मरणी शंकर ह्रुदयीं निवाला ।
तो हा मल्लांतक अवतार झाला ॥

यालागीं आवडे भाव वर्णीला ।
रामी रामदासा जिवलग भेटला ॥

म्हणजे, श्री रामाचा भक्त असून रामाचे नाव घेत असताना माझ्या हृदयात प्रत्यक्ष शंकर अवतरले. ही अनुभूती समर्थांना आली. दर्शन घेऊन बाहेर येतात तर, तो घोडा ही नाही आणि तो धनगर ही नाही.

समर्थांनी ओळखले की प्रत्यक्ष श्री खंडोबा समर्थांना गडावर घेऊन आले होते. मी देवाला कष्ट दिले याचे समर्थांना फार वाईट वाटले.
हीच खंडोबाची आरती सर्व महाराष्ट्रभर प्रचलित आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

मकरसंक्रातीला सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 मंत्रांचा जप

मकरसंक्रातीला सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 मंत्रांचा जप करा
14 जानेवारीला सूर्य मकर राशीत जाईल आणि खरमास संपेल, रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन 12 ...

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा ...

Skanda Sashti 2022: स्कंद षष्टीची तारीख, महत्त्व आणि पूजा पद्धती जाणून घ्या
Skanda Sashti 2022: स्कंद षष्ठी हा दक्षिण भारतात साजरा केला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा सण ...

मकर संक्रांतीची पौराणिक कथा

मकर संक्रांतीची पौराणिक कथा
मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. ...

Guruvar Vrat: गुरुवारी व्रत केल्यास भगवान विष्णू, लक्ष्मी, ...

Guruvar Vrat: गुरुवारी व्रत केल्यास भगवान विष्णू, लक्ष्मी, गणेशजीही होतील प्रसन्न
गुरुवार व्रत: आज गुरुवार हा धार्मिक दृष्टीकोनातून अतिशय शुभ दिवस आहे. गुरुवारी व्रत ...

हिंदू कॅलेंडरमध्ये पौष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात हे ...

हिंदू कॅलेंडरमध्ये पौष महिन्याचे महत्त्व, या महिन्यात हे काम नक्की करा
हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याची स्वतःची खासियत असते आणि प्रत्येक महिना कोणत्या ना ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...