रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. मराठी कलावंत
Written By
Last Updated : बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (22:36 IST)

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लाडके ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षाचे होते. मुंबईच्या धीरूभाई अंबानी रुग्णालयात रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या मुलाने अजिंक्य देव यांनी दिली. 

अभिनेता, निर्माता दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूर महाराष्ट्रात झाला. आनंद या चित्रपटातील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी अभिनेत्री सीमा देव यांच्याशी लग्न केले . रमेश देव यांनी अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.