Kaal Sarp Dosh: कुंडलीत 'काल सर्प दोष' असेल तर घाबरू नका, विचार केला नसेल तेवढी प्रगती होईल

kalsarp dosh
Last Modified बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (23:18 IST)
कालसर्पयोग घातकी मानला जातो. पण ही गैरसमजूत आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा ग्रह असतो ती व्यक्तीही यशस्वी होते. जगातील अनेक राष्ट्राध्यक्ष, उद्योगपतींच्या कुंडलीत हा योग होता. तरीही ते यशस्वी ठऱल्याची उदाहरणे आहेत. ज्यांच्या कुंडलीत हा योग नाही त्यांच्यापेक्षाही ते यशस्वी ठरले हे विशेष.

कालसर्पयोग म्हणजे काय?

कुंडलीत सर्व ग्रह राहू व केतू यांच्या मध्ये येतात हा कालसर्पयोग. राहू या सापाचे मख व केतू शेपटी असतो. हा योग आला की लोक अगदी घाबरून जातात. पूर्वजन्मातील पापांमुळेच हा योग येत असल्याची सामान्यजनांची धारणा आहे. या योगाने भविष्यात घडणार्‍या एखाद्या घटनेची पूर्वकल्पना मात्र मिळू शकते. मात्र, हा योग ज्यांच्या कुंडलीत आहेत, ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना हवे ते साध्य करतात हेही तितकेच खरे आहे. अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो, उच्चाधिकाराच्या जागा मिळतात. पण त्याचवेळी हा योग तीव्र स्वरूपात असेल तर भिकारी बनण्याची वेळही येते. खूप परीश्रम करूनही काहीही पदरात पडत नाही. मूल होत नाही किंवा मुलाबाळांचा आकस्मिक मृत्यू, लग्न न जमणे, घरात तणाव, व्यवसायात तोटा, धनप्राप्तीत अडथळा, खोटे खटले, मानसिक अशांती या समस्या भोगाव्या लागतात. मागच्या जन्मी केलेली पापे या जन्मात भोगावी लागतात.
कालसर्पयोग घातक व अनिष्टदायी आहे. पण याचा अर्थ हा योग असणार्‍यांच्या आयुष्यात यश कधीच येणार नाही, असे नसते. हा योग असणारी मंडळीही यशस्वी ठरल्याची उदाहरणे आहेत. फक्त एवढंच की त्यांनाही या योगाचा त्रास सहन करावा लागतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन, प्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड, अभिनेता राजकपूर, अशोक कुमार, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम, इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन, मुगल बादशाह अकबर, जर्मन हुकूमशहा हिटलर यांच्या कुंडलीतही कालसर्पयोग होता. तरीही ही मंडळी एवढ्या मोठ्या पदांवर पोहोचली.
कालसर्प योगाचा दुष्प्रभाव टाळण्यासाठी.....

आपले आचरण चांगले असू द्या.
माता पित्यांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद घेत जा.
ब्राह्मणाकडून कालसर्प योग निघून जाण्यासाठी विधी करून घ्या.
हा योग उग्र स्वरूपात असेल तर तो विधी तीन ते पाच वेळा करावा लागतो.
पंचमीचे व्रत करून नवनाग स्त्रोत्र पठण करा.
शिवोपासना करा व दरवर्षी रूद्राभिषेक करा.
वडाला रोज 108 प्रदक्षिणा घाला.
शिवलिंगावर तांबे वहा.
नाग-नागिणीचा जोडा गंगेत सोडून द्या.
सर्प सूक्ताचे नित्य पठण करा.
नागबली व नारायण बली विधी करा.
प्रत्येक अमावस्येला पितृ पूजन व तर्पण करा.
गायत्री मंत्र वा नाग गायत्रीचा पाच लाख जप करा.
रोजच्या जेवणातील पहिली पोळी गाय, कावळा वा कुत्र्याला खाऊ घातल्यानंतर मगच भोजन करा.
घराच्या दरवाजावर शुभ चिन्ह लावा.
सफेद चंदनाचा टिळा रोज लावा.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

तिसरा श्रावण सोमवार 2022 : श्रावण सोमवार पुजा आणि व्रत कसे ...

तिसरा श्रावण सोमवार 2022 :  श्रावण सोमवार पुजा आणि व्रत कसे करावे
श्रावण सोमवार पुजा आणि व्रत नियम सध्या श्रावण महिना सुरु असून 15 ऑगस्ट रोजी तिसरा ...

Sankashti Chaturthi 2022: भाद्रपद महिन्याची आजची संकष्टी ...

Sankashti Chaturthi 2022: भाद्रपद महिन्याची आजची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची पद्धत
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे.या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली ...

श्री सूर्यदेवाची आरती

श्री सूर्यदेवाची आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा

सूर्यदेवाचे सोपे मंत्र अवश्य म्हणावे

सूर्यदेवाचे सोपे मंत्र अवश्य म्हणावे
दर रविवारी सूर्य पूजन आणि सूर्य मंत्राचा जप 108वेळा केल्याने अवश्य त्याचे फळ मिळतात. जर ...

श्रावण रविवारी वाचावी आदित्यराणूबाईची कहाणी

श्रावण रविवारी वाचावी आदित्यराणूबाईची कहाणी
ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य ...

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...