शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. गुरूमंत्र
Written By
Last Modified: मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (20:22 IST)

अभ्यास करताना झोप येते हे उपाय अवलंबवा

बऱ्याच लोकांची सवय असते की ते अभ्यास करताना पुस्तकांवर डोकं ठेवून झोपतात. अभ्यास करताना झोप येणे हे साहजिक आणि सामान्य आहे. अभ्यास करताना झोप येते या मुळे मेंदू काम करणे बंद होते. डोळ्यात झोप येत असताना बळजबरी अभ्यास केल्याने ते लक्षात राहत नाही आणि झोपावं लागतं.या मुळे विद्यार्थी आपल्या ध्येयाची प्राप्ती करू शकत नाही.  
या साठी असे काही उपाय आहे ज्यांना अवलंबवून आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 
 
1 मंद प्रकाशात अभ्यास करू नका- 
बरेच लोक एक लॅम्प लावून अभ्यास करतात या मुळे त्याचा प्रकाश मंद असतो. अशा वातावरणात झोप येणं साहजिक आहे.अभ्यासाच्या खोली मध्ये प्रकाश चांगला असावा.  
 
2 झोपून अभ्यास करू नका- 
अभ्यास करताना पलंगावर झोपून अभ्यास करू नका. या मुळे आळस येऊन आपल्याला झोप येईल. म्हणून अभ्यास करताना नेहमी खुर्ची टेबलचा वापर करावा. खुर्चीवर बसल्यावर हातापायाची हालचाल करत राहा. जेणे करून आपण सक्रिय राहाल. 
 
3 अत्यधिक खाऊ नका- 
जास्त खाऊ नका.या मुळे आळस आणि सुस्तपणा जाणवेल आणि झोप येईल. कमी खा दिवसातून तीन वेळा खाण्याऐवजी 5 वेळा खा. उपाशी राहू नका. असं केल्यानं लक्षात ठेवण्याची समस्या नाहीशी होते. जेवण झाल्याच्या लगेचच अभ्यासाला बसू नका. 
 
4  भरपूर पाणी प्यावं-
अभ्यास करताना जास्त पाणी पिणं हे आरोग्यासाठी चांगले आहेच. एक फायदा अजून आहे की जास्त पाणी प्यायल्यानं आपल्याला वारंवार लघवीला जावे लागेल, या मुळे सक्रियता वाढेल आणि झोप येणार नाही. पाणी प्यायल्यानं मेंदू हायड्रेट आणि ताजे तवाने राहते आणि सक्रिय राहते या मुळे पाठांतर करायला मदत मिळते.    
 
5 लवकर झोपा आणि लवकर उठा - 
असं म्हणतात की "Early to bed, early to rise makes a man healthy, wealthy and wise” ही म्हण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. असं  केल्यानं शारीरिक आरोग्य चांगले राहते, स्मरणशक्ती वाढते लवकर झोपून लवकर उठल्याने मेंदू फ्रेश राहतो आणि पाठांतर लवकर होते.
 
6 दुपारी एक डुलकी घ्या- 
परीक्षेच्या दिवसात जर आपण सकाळी अभ्यास केल्यावर दुपारी देखील अभ्यास करता तर थकलेल्या मेंदूंसह अभ्यास करणे अवघड होईल. या साठी दुपारच्या जेवणानंतर तास भर झोप काढा ,या मुळे आपण ताजेतवाने व्हाल आणि मेंदू पुन्हा सक्रिय होऊन नवीन गोष्टी लक्षात ठेवण्यास सज्ज होईल. 
 
7 रात्री आवडीच्या विषयाचा अभ्यास करा- 
रात्री आवडीच्या विषयाचा अभ्यास करा असं केल्यानं लवकर पाठांतर होईल आणि तो विषय लवकर समजेल. आपल्याला कंटाळा पण येणार नाही.अभ्यास उशिरा पर्यंत करू शकाल. 
 
8 बोलून आणि लिहून अभ्यास करा-  
 ही  पद्धत अभ्यास करताना येणाऱ्या आळस ला दूर करण्यासाठी प्रभावी आहे. या पद्धतीने अभ्यास केल्याने मेंदू सतर्क आणि सक्रिय राहतो. झोप येत नाही आणि गोष्टी लक्षात ठेवणे सोपे होते. या शिवाय स्वतःला समजवून अभ्यास केल्यानं धडा लवकर लक्षात राहतो. 
या उपायांना अवलंबवून आपण एकाग्रते अभ्यास करू शकता आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकता.