कोविडनंतरची केसगळती

hair fall
Last Modified रविवार, 22 ऑगस्ट 2021 (15:38 IST)
आपल्या शरीरावर एखादा ताण पडतो, तेव्हा केसांना रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन मिळत नाही. कोविडमधून बरे झालेल्या लोकांत कार्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शरीर सरवाईवल मोडमध्ये जाते आणि त्यामुळे अनेक भागात रक्ताचा पुरवठा कमी होतो. अशावेळी केसांना संपूर्णपणे ऑक्सिजन मिळत नाही आणि वाढणारे केस गळण्याच्या श्रेणीत जातात.
केस वाढण्याचा टप्पाः आपले केस तीन टप्प्यातून जातात. अ‍ॅनाजन (जेव्हा केस वाढतात, कॅटाजन (केस आल्यानंतर थांबण्याची स्थिती) आणि टिलोजन (गळतीची स्थिती).
सर्वसाधारणपणे आपल्या केसातील 90 ते 95 ट्रके केस हे ग्रोथ फेजमध्ये असतात आणि 5 ते 10 टक्केकेस हे शेडिंग फेजमध्ये असतात. ग्रोथ फेजचे आयुष्य हे सर्वसाधारणपणे तीन ते चार वर्षांपर्यंत असते आणि शेडिंग फेजचा टाइम हा तीन ते चार महिन्यांचा असतो. शेडिंग फेजचे केस नॉर्मल प्रक्रियेत थोड्या थोड्या प्रमाणात गळत राहतात. याकडे फारसे लक्ष नसते.
परंतु जेव्हा एखादा गंभीर आजार होतो, तेव्हा आपले केस ग्रोथ फेजमधून शेडिंग फेज म्हणजेच टिलोजेन स्टेजमध्ये येतात. यात टिलोजनएफलुवियम फेज असेही म्हटले जाते. अनेकांत या फेजमध्ये केस गळण्याचे प्रमाण 40 ते 50 टक्के

राहू शकते. ही गळती आजारपणानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर सुरू होते. कारण आजारपणाच्या काळात खूप केस टिलोजन फेजमध्ये जातात आणि तब्बल दोन महिन्यानंतर रुग्णांचे केस गळू लागतात. केस वाढीच्या सायकलमध्ये दररोज शंभर केसांची गळती सामान्य मानली जाते. परंतु कोविडमधून बरे झालेल्या लोकांत टिलोजन स्टेजमध्ये 300 ते 400 पेक्षा अधिक केस गळती होऊ शकते.
अनेकांच्या मते, आपण दररोज भांग पाडला नाही किंवा केस धुतले नाही तर ते कमी गळतील. परंतु शास्त्रीयदृष्ट्या ही बाब चुकीची आहे. आज गळणारे कसे हे दोन अडीच महिन्यांपूर्वीच शेडिंग फेजमध्ये गेलेले असतात आणि ते हळूहळू गळू लागतात. जर पाच दिवस एखाद्याने भांग पाडला नाही आणि त्यानंतर कंगवा केसात फिरवला तर पाच दिवसाएवढेच केस एकाचवेळी गळतील.
केस गळण्याचे अन्य कारणे : केस गळण्याचे अनेक कारणे असू शकतात. परंतु आपल्याला एखादा गंभीर आजार म्हणजेच मुदतीचा ताप, डेंगी, मलेरिया यासारखा तापेचा आजार असेल तेव्हा केस गळतीची शक्यता राहते. क्रॅशन डायटिंग करताना किंवा बेरियाट्रिक सर्जरी करतो, तेव्हा हेअर फॉलिंग होते. इमोशनल कंडिशन, अभ्यास किंवा कामामुळे स्ट्रेस जाणवतो, तेव्हाही केस गळतात. पोषक तत्त्वांच्या अभावामुळे देखील स्ट्रेस होतो, तेव्हा केस गळतात किंवा शेडिंग फेजमध्ये जातात.
उपचार : केसगळतीचे निदान केल्यानंतर केस गळती रोखण्यासाठी न्यूट्रिशनल सप्लिमेंटस दिले जाते. यात बायोटिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटिन, व्हिटॅमिन, मिनरल्स याचा समावेश असतो. हेअर लॉसपासून वाचण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल आणि हेल्दी डायटला फॉलो करायला हवे. काहीकाळ सूर्यप्रकाश अंगावर घ्यायला पाहिजे. सकारात्मक राहा, मेडिटेशन करा, व्यायाम करा या सर्व गोष्टी रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत करतात. गळणारे केस परत येतील, यावर विश्वास ठेवा.
जगदीश काळे


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?

माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?
माणूस जसा भासवतो, खरं तो तसाच असतो?

तुम्हाला दररोज किती लोह (iron) आवश्यक आहे, योग्य प्रमाणात ...

तुम्हाला दररोज किती लोह (iron) आवश्यक आहे, योग्य प्रमाणात जाणून घ्या
How much iron do you need? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ( WHO ) नुसार, प्रजनन वयातील जगातील ...

Possessive Partner लाईफ खराब करु शकतो, आपणही अशा ...

Possessive Partner लाईफ खराब करु शकतो, आपणही अशा रिलेशनमध्ये तर नाही?
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर फीलिंग असते. कोणाच्या प्रेमता पडल्यावर पूर्ण जग बदलून जातं ...

स्कॅल्पवर कोंडा झाल्याने खाज येते, या टिप्स अवलंबवा

स्कॅल्पवर कोंडा झाल्याने खाज येते, या टिप्स अवलंबवा
हिवाळ्यात कोंड्याची तक्रार बहुतेक लोक करतात. अशा स्थितीत डोक्याला खाज येणे, केस लवकर ...

किचन सिंकमधून येणाऱ्या वासाने हैराण झालात, सिंक सुगंधित ...

किचन सिंकमधून येणाऱ्या वासाने हैराण झालात, सिंक सुगंधित करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
हिवाळ्यात सूर्यप्रकाश नसल्यामुळे घराला वेगळाच वास येऊ लागतो, पण स्वयंपाकघरातील सिंक साफ न ...