शौचास रक्त येत असल्यास, या गोष्टींचे सेवन करू नका
शौचास रक्त येणे हे विविध आजारांचे संकेत आहे. या मध्ये बद्धकोष्ठता, मूळव्याध फिशर, हे सामान्य आहे. दररोज तर शौचास रक्त येत नाही परंतु अधून -मधून येत असल्यास तर हे पचन तंत्राशी संबंधित समस्या दर्शवते. या साठी डॉक्टर्स औषधोपचार करतात. तरी आपल्या आहारात बदल करून देखील आपण या त्रासाला कमी करू शकतो. ही समस्या असल्यास आहारात या गोष्टी घेणं टाळावे. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या गोष्टी घेऊ नये.
1 अधिक तेलकट खाणे -अधिक तेलकट पदार्थ खाल्ल्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ऍसिडिटीचा त्रास अधिक प्रमाणात असल्यास शौचास रक्त येऊ लागते. म्हणून पूरी,समोसा,तिखट भाज्या हे खाऊ नका. रात्री तर अजिबात याचे सेवन करू नका.
2 मैद्याचे पदार्थ- मैद्याच्या वस्तूंचे सेवन करू नका. अशा प्रकारचे खाद्य पदार्थ खाल्ल्याने पोटात सूज येऊ लागते. सूज असल्यामुळे शौचात रक्त येऊ लागते. म्हणून मैद्याचा वस्तूंचे सेवन अजिबात करू नका.
3 कॅफिन - हे आपल्यासाठी सर्वात जास्त हानिकारक आहे .कारण ह्याच्या सेवन केल्याने बद्धकोष्ठता वाढते. त्या मुळे जास्त जोर लावल्यावर रक्त येतो. म्हणून चहा, कॉफीचे सेवन करू नका. या ऐवजी आपण ताक,शिकंजी घेऊ शकता. ते आपल्यासाठी फायदेशीर आहे.
4 जंक फूड घेऊ नका- जंक फूडचे सेवन आपल्या आरोग्यात बिघाड आणतात. जंक फूड चमचमीत असेल किंवा तिखट असेल तर त्याचा त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन मूळव्याध, फिशर सारख्या समस्येला सामोरी जावे लागू शकते. या साठी जंक फूड अजिबात खाऊ नका.