गुरूवार, 30 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified रविवार, 15 जानेवारी 2023 (17:07 IST)

स्त्रियांमध्ये क्लिटॉरिसचा आकार वाढण्याची काय कारणं असतात? त्यावर उपाय काय?

क्लिटॉरिस (शिश्निका)  मोठं असणं हा आजार नाही,  एक रोग आहे त्याला  clitoromegaly असं म्हणतात. ही स्थिती का उद्भवते याची अनेक कारणं असतात. त्यात काही अनुवांशिक कारणं असतात तर अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे असं होतं. स्टिरॉईडच्या वापरामुळे सुद्धा ही स्थिती उद्बवते. उत्तर ब्राझीलच्या Assis Chateaubriand Maternity School मध्ये नुकतीच clitoroplasties ही सर्जरी करण्यात आली

मारिया 22 वर्षांची आहे. तिच्यावर ही सर्जरी करण्यात आली आहे. बीबीसीशी बोलताना तिने या सर्जरीविषयी माहिती दिली. ती म्हणाली की तिने डॉक्टरांनी तिची शिश्निका वाढल्याचं सांगितलं. ती डिसेंबर 2021 पासून हार्मोनची ट्रिटमेंट घेत आहे.
 
मारियाचं हा लैंगिक अवयव सेक्स करताना आकाराने वाढायचा. त्यामुळे तिला अतिशय अस्वस्थ वाटायचं.
 
“मी वयाच्या 18 व्या वर्षी सेक्स करायला सुरुवात केली. तेव्हा मला शिश्निकेत सूज आल्याचं जाणवलं. त्यामुळे मला फार काळजी वाटायची.” ती सांगत होती.

तोडगा काढण्याचं आवाहन
मारिया स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेली. शिश्निकेचा आकार कमी करण्याची काही शक्यता आहे का हे तिने विचारलं. तेव्हा तिला या अनुवांशिक रोगाचं निदान झालं.
 
“मला रोजच्या आयुष्यात फारसं काही वाटलं नाही. मात्र सेक्स करताना मी नेहमी विचार करायचे की हे बरोबर दिसत नाही. म्हणून मला त्याचा आकार कमी करायचा होता.” मारिया म्हणाली.
 
तिच्या पार्टनर ने याबाबत कधीही तक्रार केली नाही असंही तिने सांगितलं. मात्र तिला स्वत:लाच अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्यास त्याने सांगितलं.
 
सीरा येथे कोणीही तज्ज्ञ शल्यचिकित्सक नव्हता. त्यामुळे साओ पाअलो येथे 3000 किमी अंतरावर सर्जरी करायला जावं लागलं.
 
“सर्जरी अतिशय व्यवस्थित झाली. आता मला अगदी व्यवस्थित वाटतंय. कारण माझ्यासाठी हे नॉर्मल नव्हतं.” ती म्हणाली.
 
“अनेक लोकांसाठी हा छोटीशी अडचण आहे. पण या परिस्थितीत राहणं कठीण आहे. हा आजार नाही.”
 
मारसिलो प्राक्सडेस या स्त्रीरोगतज्ज्ञांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांनी इशारा दिला की वाढलेली शिश्निका हा एक नवीन आजार आहे. त्यामुळे स्त्रियांच्या आत्मसन्मानावर परिणाम होतो.
“वाढलेली शिश्निका हा रोग नाही.” असंही त्या पुढे सांगतात.
 
क्लिटोरोप्लॅस्टी म्हणजे काय?
शिश्निका किंवा क्लिटॉरिस मुळे स्त्रियांना लैंगिक सुखाचा आनंद मिळतो. या सर्जरीत या अवयवाच्या मुख्य कामावर काहीही परिणाम होत नाही.
 
या अवयवाला 8000 पेक्षा अधिक चेतापेशी असतात. शिश्निकेचा आकार व्यक्तिपरत्त्वे बदलतो.
 
प्राक्सडेस यांनी या अवस्थेसाठी काही कारणं शोधली आहे. हार्मोन किंवा अनुवांशिकतेमुळे ही अवस्था येतेच. पण शरीर कमावण्यासाठी स्टिरॉईड घेतल्यामुळेही शिश्निकेचा आकार  वाढतो.
 
गरोदरपणात हार्मोन्सचा अतिरेकी वापर केला तरीही शिश्निकेचा आकार वाढतो.काही केसेसमध्ये या अवयवाची वाढ जास्त झाली तर PCOS (Polycystic Ovarian Syndrome) चा त्रास होण्याची शक्यता आहे.
वयात आलेल्या मुलींमध्ये PCOS हा नियमितपणे आढळणारा रोग आहे. प्रजननक्षम असलेल्या 5 ते 17 टक्के स्त्रियांमध्ये हा रोग आढळतो असं प्राक्सडेस यांनी सांगितलं.
 
यामुळे मासिक पाळीत अनियमितता येते, पुरळ येतात, शरीरावर अतिरिक्त केस येतात, तसंच शिश्निकेच्या आकारात वाढ होते.
 
सेक्स करताना उत्तेजनेमुळे शिश्निकेच्या आकारात वाढ होतेच. हे सगळ्याच बायकांमध्ये होतं. मात्र ज्या बायकांच्या शिश्निकेचा आकार आधीच वाढलेला असतो त्यांच्या शिश्निकेचा आकार सेक्स करताना अधिकच वाढतो. त्यामुळे सेक्स करताना त्रास होतो.
 
तज्ज्ञांच्या मते ज्यांच्या शिश्निकेत वाढ झालेली असते त्या बायका बिकिनी किंवा तंग कपडे घालणं टाळतात. कारण वाढलेल्या आकाराच्या गुप्तांगामुळे नजरा चाळवल्या जातात.
 
“आम्ही सर्जरी करताना ज्या पेशींची वाढ झाली आहे त्या काढून टाकतो. मात्र जे भाग नाजूक आहेत ते आम्ही तसेच ठेवतो.” असं त्या पुढे म्हणतात.
 
शिश्निकेचा विशिष्ट आकार असतो का?
शिश्निकेचा विशिष्ट आकार नसतो. त्यामुळे जर आकार वाढल्याचं लक्षात आलं किंवा दिसलं तेव्हा डॉक्टरकडे जाणं कधीही चांगलं.
 
“शिश्निका वाढली की नाही हे रुग्णाने पाहू नये. कारण तसं पाहिलं तर ही अतिशय खासगी समस्या आहे. शिश्निकेत थोडी वाढ झाली असेल आणि स्त्रीला आनंद मिळत असेल तर काही अडचण नाही.” त्या पुढे सांगतात.
 
वैद्यकीय क्षेत्रात Prader नावाची एक संकल्पना आहे. त्यात एक ते चार अशी विभागणी केली जाते. तसंच लैंगिक अवयवांच्या आकारमानाचा अंदाज घेण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला जातो. मात्र शिश्निकेच्या बाबतीत तज्ज्ञच ती तपासतात.

Published By - Priya Dixit