शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी हे खाणे टाळावे...

आई होणे हे प्रत्येक स्त्री साठी आनंदाची बाब असते. मातृत्व मुळे स्त्री पूर्ण आहे. गरोदरपणात तसेच आई झाल्यावर म्हणजेच बाळाला जन्मानंतर एक स्त्रीला पोषक तत्त्वांची कमतरता भासते. त्या साठी तिने संतुलित आणि पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. जेणे करून तिचे आणि बाळाचे आरोग्य सुदृढ राहील. बाळ जन्माअगोदर आणि जन्मानंतरपण आपल्या आईवरच निर्भर असतो. कारण आई जे काही खाते ते तिच्या बाळास मिळत असते. त्यासाठी तिने समतोल आणि सकस आहार घ्यायला हवे. जेणे करून बाळास काही त्रास होऊ नये. तुमच्या खान-पान मध्ये केलेल्या एका चुकीने ही बाळाच्या आरोग्यास हानी होऊ शकते. 
 
आई बाळास स्तनपान करवते त्यामुळे तिच्या दुधातून बाळाला आहार मिळत असे. आणि तेच त्याचा वाढीस लाभकारी असते. आईने आपल्या आहारात गरिष्ठ पदार्थाचा समावेश केल्यास बाळास त्रास होऊ शकतो. स्तनपान करवत असलेल्या स्त्रियांनी आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला नको ते जाणून घेऊ या. 
 
1. आपल्या जेवणात उडीद डाळ किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे यामुळे पोटात गॅस बनतात आणि त्यामुळे बाळास त्रास होऊ शकतो. बाळाचे पोट दुखू शकते.
 
2. तळकट पदार्थाचे सेवन करू नये. त्यामुळे बाळाच्या लिव्हरला त्रास होऊ शकतो. अपचन होऊ शकते.
 
3. साखरापासून बनवलेल्या पदार्थांचा वापर कमी करावा. जास्त गोड खाण्याने बाळास भविष्यात मधुमेहाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते.   
 
4. बाहेरचे खाणे चिप्स, शीतपेय, पिझ्झा, बर्गर खाणे टाळावे. बाळाला पोट दुखणे, हगवणीचा त्रास तसेच स्थूलपण्याचा त्रास होऊ शकतो.  
 
5. धूम्रपान, मद्यपान, शीतपेय घेणे टाळावे, बाळाच्या आरोग्यास त्रास होऊ शकतो. 
 
6. शिळ्या अन्नाचे सेवन करणे टाळावे, नाही तर दुधातील पोषक तत्त्व कमी होऊन बाळाला गॅस, अपचनाचा त्रास होईल.
7. तिखट, मसालेयुक्त पदार्थाच्या सेवनाने बाळास दुधातून गळ्यात जळजळ होऊ शकते. त्यात आम्लाची वाढ होऊन ऍसिडिटी(जळजळ)चा त्रास होऊ शकतो.   
 
8. कच्च्या भाजीचे सेवन करणे टाळावे. शिजवलेले अन्नच खावे. जेणे करून बाळाला पोटदुखीचा त्रास होणार नाही. कोबी, मटार, कच्चे सॅलड खाऊ नये. बाळाला गॅस तसेच पोटदुखीचा त्रास होईल.
 
9. मांसाहार खाऊ नये. ते बाळाच्या पचनास जड असल्याने त्याचा पचनतंत्रावर दुष्परिणाम होऊ शकतो.