बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (22:30 IST)

Healthcare Tips :निद्रानाशच्या त्रासाने त्रस्त आहात, हे उपाय अवलंबवा, चांगली झोप येईल

Health care Tips :बदलत्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, कधीकधी काही लोकांना तणाव, चिंता,असते त्यामुळे चांगली झोप येत नाही. काही जण रात्रभर जागेच असतात. झोपण्यापूर्वी चुकीच्या सवयीमुळे निद्रानाशाचा त्रास होतो.
निद्रानाश म्हणजे काय ?
काही लोकांना लवकर झोप येत नाही, काहींना गाढ झोप येत नाही आणि काहींना रात्रभर झोप येत नाही. या दिनचर्येमुळे झोप कमी होते. या मुळे आरोग्याच्या अनेक समस्या उदभवतात.हे काही उपाय अवलंबवून तुम्ही निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हात, चेहरा आणि पाय धुवा. असे केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते.
 
2.  दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन करू नका.
 
3. झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यानेही मन शांत आणि स्थिर राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो, ज्यामुळे झोप चांगली लागते.
 
4. चिमूटभर जायफळ दुधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्या. यामुळे झोप चांगली येण्यासही मदत होते.
 
5. तुम्ही ही श्वासोच्छ्वासाची युक्ती देखील वापरून पाहू शकता, यासाठी तुम्हाला चार सेकंद नाकातून श्वास घ्यावा लागेल, नंतर तो सात सेकंद धरून ठेवावा आणि आठ सेकंद सोडत राहा. असे केल्याने हृदयाची धडधड मंदावते आणि मेंदूमध्ये एक रसायन सोडले जाते, ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit