शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (16:47 IST)

कोरोना : डायबिटीजच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अजूनही सुरू आहे. यावर लसीकरण, मास्क, सामाजिक अंतर आणि हात धुणे हे टाळण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहेत. ज्याचे सर्वांनी सतत अनुसरण केले पाहिजे. विषाणू लोकांपर्यंत कोणत्या मार्गाने पोहचत आहे याची स्पष्टपणे पुष्टी झालेली नसून यावर अजूनही संशोधन सुरुच आहे. तरी सामान्य लोक कोरोनामधून बरे होत आहेत परंतु मधुमेह रूग्णांसाठी हा आजार घातक असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 
कोरोनावर उपचारासाठी डॉक्टरांकडून स्टिरॉइड औषध दिले जात आहे. यात साखरेच्या पातळीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मधुमेह रूग्णांमधील धोकादायक लक्षणे-
 
1. काळ्या बुरशीजन्य संसर्गाचा धोका
 
2. न्यूमोनियाचा धोका
 
3. कमकुवत रोगप्रतिकारक यंत्रणा
 
4. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका
 
5. व्हेंटिलेटरची आवश्यकता
 
मधुमेह असलेले रुग्ण जे कोरोना व्हायरसपासून वाचलेले आहते त्यांनी या 5 गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे-
 
1. शरीरात पाण्याची कमतरता येऊ देऊ नका.
2. सकाळी आणि संध्याकाळी किमान 40 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे.
3. दर तासाला 10 मिनिटे उभे रहा. तसेच, घरात फिरत रहा.
4. आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवा.
5. चेहरा आणि नाकाला वारंवार स्पर्श करणे टाळा.