1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 30 जून 2021 (09:00 IST)

पावसाळ्यात या 5 भाज्या धोकादायक आहे ,या खाऊ नये

पावसाळ्यात काही चमचमीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते.गरम कांदाभजी किंवा पालकाच्या भजीची आठवण येते.परंतु पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे या दिवसात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.दूषित पाणी पिऊन आपण आजारी पडू शकतो.
 
पावसाळा येताच सर्वत्र हिरवळ होते,वाळक्या भाज्यादेखील हिरव्या होतात. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्यास मनाई असते. जाणून घेऊ या, या दिवसात कोणत्या भाज्या खाऊ नये. 
 
1 पालक- पावसाळ्याच्या दिवसात पालक हिरवा होतो, परंतु या भाजीपालावर बारीक कीटक असतात,म्हणून पावसाळ्याच्या दिवसात पालक खाऊ नये.
 
 
2 पान कोबी- पानकोबी सलॅड म्हणून जास्त वापरतात परंतु या भाजीला अधिक थर असल्यामुळे या मध्ये बारीक बारीक कीटक असतात.अशा परिस्थितीत हे कीटक आपल्या शरीरात जातात.आणि आपण आजारी पडू शकता.म्हणून या दिवसात पालेभाज्या खाऊ नये.
 
3 वांगी -गरम वांग्याचे भरीत कोणाला आवडत नाही.पावसाळ्यात हे अधिकच चविष्ट लागतं.परंतु आपणास माहित आहे का,की पावसाळ्यात फळे आणि फुले येतातच त्यांच्या मध्ये कीटक लागू लागतो.आणि हे वनस्पतींवर हल्ला करतात या मुले 70 टक्के वांगी खराब होतात.
 
4 टोमॅटो - पावसाळ्यात पचन प्रक्रिया कमी होते. टोमॅटोमध्ये काही क्षारीय तत्व असतात,ज्यांना वैज्ञानिक भाषेत एल्कालॉयड्स म्हणतात हे एक प्रकारचे विषारी रसायन आहे जे वनस्पतींवर कीटक पासून वाचविण्यासाठी वापरतात.अशा परिस्थितीत पावसाळ्यात टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्वचेचे आजार  होतात.जसे पुरळ होणे,नॉजिया,खाज होणे.म्हणून पावसाळ्यात टोमॅटोचे सेवन करू नये.
 
5 मशरूम- पावसाळ्यात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.मशरूम प्रदूषित ठिकाणी आणि वातावरणात वाढतो.मशरूम हे वेगवेगळ्या प्रजातीचे असतात.काही विषारी तर काही खाण्यायोग्य.अशा परिस्थितीत खाणे योग्य मशरूम देखील शरीरासाठी हानिकारक असू शकतात.