शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

विचित्र पण सत्य आहे...

पूर्वी माणूस जेवण घरी 
करीत होता आणि शौचालय बाहेर होतं.
आता जेवण बाहेर करतो 
आणि शौचालय घरात आहे
 
पूर्वी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे. 
कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये. 
आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात. कारण 
कुणी माणूस घरात येऊ नये
 
पूर्वी लग्नात घरच्या स्त्रिया जेवण बनवायच्या 
आणि नाचणार्‍या बाहेरून यायच्या.
आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात 
आणि घरातल्या स्त्रिया नाचतात
 
पूर्वी माणूस सायकल चालवायचा 
तो गरीब समजला जायचा.
आता माणूस कारने जिममध्ये जातो 
अन् सायकल चालवतो
 
पूर्वी वायरीच्या फोनने 
लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाइलने
जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत
 
पूर्वी माणूस चुलीवर स्वैपाक करायचा 
मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला 
ढाबा शोधायला जातो
 
पूर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन् 
हातातले फोन स्मार्ट झालेत
 
पूर्वी रस्ते मातीचे अन् 
माणसे साधी होती
आता रस्ते डांबरी अन्
माणसे डांबरट झालेत