शनिवार, 2 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"

"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???
   "जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."
 
श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :
 
पार्था, 
 
     "मांजर जेव्हा उंदराला पकडते 
तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना 
खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे, फक्त
परीणाम वेगवेगळे आहेत.."
 
     "तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,
तर दुसरा ८४ फेर्‍यामध्ये अडकेल.."
 
: विष  काय आहे ..?
     "भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा
जास्त मिळाली की ती विष बनते...
मग ती ताकत असो
गर्व असो.
पैसा असो.
भूक असो.."
 
     "शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l