1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

बाल कथा : देव कसा दिसतो ?

लहानगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता. एके दिवशी शाळेत वर्गशिक्षिकेने मुलांना ध्रुव बाळाची गोष्‍ट सांगितली. ध्रुव बाळाला रानात देव भेटला हे त्याला उमगले. माधवने बाईंना विचारले, ''ध्रुव किती मोठा होता?'' बाई उत्तरल्या, ''तुमच्या वयाचा होता.'' 

माधवचे विचारचक्र सुरू झाले. मला देव दिसेल कां? पण रान कसे असते? शाळेतील एका मोठ्या मुलाने सांगितले रानात खूप मोठी झाडे असतात. दुसर्‍या मुलाकडून समजले गावाजवळ एक मोठा पार्क आहे, तेथे खूप झाडे आहेत. माधवने गृहित धरले तेथे नक्कीच देव भेटेल.
 


एका रविवारी मित्रा बरोबर पार्कमध्ये सहलीला जातो असे घरी सांगितले. आईने एका पिशवीत लाडू व सरबताची बाटली दिली.

  WD
माधव एकटाच चालत चालत गावाबाहेरील पार्क मध्ये पोहोचला. चालून थकल्यामुळे एका झाडाखाली बसला. भूक लागल्यामुळे लाडू खाण्याकरीता पिशवी उघडू लागला. तितक्यात समोरच्या झाडाखाली त्याला एक वृद्ध गृहस्थ ‍‍दिसला. खूप भूकेला वाटत होता. माधवने एक लाडू त्याला नेऊन दिला. वृद्धाने लाडू घेतला व माधवकडे बघून स्मित हास्य केले. माधवला हे हास्य खूप सुंदर दिसले.

  WD
हे हास्य परत बघण्याची त्याला इच्‍छा झाली. त्याने वृद्धाला सरबत नेऊन दिले. यावेळी वृद्ध अधिकच सुंदर हसला. संध्याकाळ होईपर्यंत माधव वृ्धाला लाडू, सरबत देत होता. वृद्धाच्या चेहर्‍यावरील हास्य अधिकच खुलत होते. अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जाण्यास निघाला. वृद्धाने त्याला प्रेमाने पोटाशी घेतले. माधव खूपच आंनदीत झाला.

घरी पोहचताच आईने त्याची आनंदी मुद्रा बघून विचारले, सहल छान झाली वाटते.
माधव उत्तरला, की आज देवा बरोबर फराळ केला. किती छान हसत होता तो. असे हास्य मी आजवर कधीच बघितले नव्हते.

पार्क मधील वृद्ध देखील आनंदात घरी गेला. मुलाने विचारले, 'बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे?' 

डॉ. गुणवंत चिखलीकर