गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:07 IST)

जातक कथा - महिलामुख हत्ती

बऱ्याच काळा पूर्वी राजा चंद्रसेन नावाचा एक राजा होता. त्याच्या तांड्यात एक हत्ती होता त्याचे नाव होते महिलामुख. तो हत्ती खूप समजूतदार, प्रेमळ आणि आज्ञाकारी होता. त्या राज्याचे सर्व लोक त्याच्या वर प्रेम करायचे राजाला देखील आपल्या या हत्तीवर फार गर्व होता.  
 
काही दिवसानंतर त्याच्या अस्तबलाच्या बाहेर काही  दरोडेखोरांनी आपली  झोपडी बांधली आणि तिथे राहू लागले.   दरोडेखोर दिवसात दरोडा टाकायचे आणि रात्री  आपल्या बहाद्दुरीचे किस्से सांगायचे. आणि पुढील दिवसाची योजना बनवायचे की आता कोणाला लुटायचे आहे आणि कुठे दरोडा टाकायचा आहे. महिलामुख त्यांच्या गोष्टी ऐकायचा आणि त्याला वाटायचे की हे दरोडेखोर किती दुष्ट आहे.  
 
काही दिवसानंतर महिलामुख वर त्यांच्या गोष्टीचा परिणाम होऊ लागला त्याला वाटायचे की दुसऱ्यांना छळने हीच वीरता आहे. म्हणून  मी पण दुसऱ्यांना त्रास देईन असं विचार करू लागला. सर्वप्रथम त्याने आपल्या महावतवर हल्ला केला आणि त्याला ठार मारले.      
 
 एवढ्या चांगल्या हत्तीला असं करत बघून सर्वाना आश्चर्य झाले आणि ते विचारात पडले की अखेर हा हत्ती असं का वागत आहे. राजाने त्याच्या वर अंकुश घालण्यासाठी नवीन महावात नेमला. त्याला देखील त्या हत्तीने ठार मारले. अशा प्रकारे त्या हत्तीने चार महावात ठार मारले.  
राजा ला काळजी वाटू लागली आणि त्याने एका बुद्धिमान वैद्याला त्या हत्तीचा उपचार करण्यास सांगितले. वैद्याने त्याच्या बदलत्या स्वभावाचे कारण जाणून घेतले त्याला कळले की महिलामुख हत्तीच्या स्वभावात हा बदल त्या दरोडेखोरांमुळे झाला आहे. त्यांनी दरोडेखोरांना पळवून लावले आणि त्या झोपडी मध्ये भजन सत्संग करू लागले.  
काहीच दिवसात महिलामुख पूर्वी सारखा शांत प्रेमळ आणि आज्ञाकारी झाला. आपला आवडीचा हत्ती ठीक झाला म्हणून राजाने वैद्याला खूप भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.
 
तात्पर्य - संगतीचा परिणाम खूप जलद आणि खोल होतो. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावे.