1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

हे करून पाहा?

पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो. स्वादही वाढतो.

ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही. गोल थापली जात नाही. या वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही.

वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी. यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते.

कोणत्याही गोड पदार्थात कणीभर मीठ घातल्यास छान चव लागते.

रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत. छान रस निघतो.