गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By

मराठी लग्न उखाणे

marathi ukhane
Wedding Marathi Ukhane मराठी लग्न उखाणे

वधूसाठी मराठी उखाणे Marathi Ukhane For Bride

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने, 
......... रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
 
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
......... रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
 
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
......... रावांचे नाव घेतांना, कशाला आढे वेढे
 
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
......... रावांचे नाव घेते, आशीर्वाद द्यावा मला
 
कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
......... रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती
 
सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
......... रावांचे नाव घेते, ......... च्या घरात
 
महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस
......... राव माझे वृंदावन, मी त्यांची तुळस
 
गोड गोड लाडू खमंग चिवडा
......... राव मला तुम्ही जन्मो जन्मी निवडा
 
नाजूक अनारसा साजूक तुपात तळावा,
........ रावांसारखा पती जन्मोजन्मी मिळावा
 
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
......... राव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती
 
एक तीळ सातजण खाई,
......... रावांना जन्म देणारी धन्य ती आई
 
साराच्या सारीपाटाची लागली मला चाहूल
......... रावांच्या आयुष्यात मी, आज टाकलं पहिलं पाऊल
 
चांदीची जोडवी लग्नाची खूण,
......... रावांचे नाव घेते, ......... ची सून
 
सौभाग्याचं कुंकू कपाळी सजलं,
पत्नीच्या नात्यानं ......... रावांनां मनोमनी पुजलं
 
तिरंगी झेंडयाला वंदन करते वाकून,
......... रावांच नाव घेते तुमचा मान राखून
 
जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,
......... रावांच नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
 
शुभवेळी शुभदिनी आली आमची वरात,
......... रावांचे नाव घेऊन टाकते पहिले पाऊल घरात
 
उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल,
......... रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिलं पाऊल
 
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,
......... रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश
 
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,
......... रावांचे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद
 
साजूक तुपात नाजूक चमचा,
......... रावांचे नाव घेते, आशीर्वाद असु दे तुमचा
 
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
रावांचे नाव घेते ......... च्या लग्नाच्या दिवशी
 
*********************** 
 
नवरदेवासाठी मराठी उखाणे Marathi Ukhane for Groom
 
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
......... च्या नादाने झालो मी बेभान
 
परातीत परात चांदीची परात
......... लेक आणली मी ......... च्या घरात
 
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
......... चे नाव घेतो ऐका देऊन कान
 
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी ......... म्हणते मधुर गाणी
 
केसर दुधात टाकलं काजू, बदाम, जायफळ,
......... नाव घेतो,वेळ न घालवता वायफळ
 
चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली गल्ली
पण शेवटी ......... कडे सापडली माझ्या हृदयाची किल्ली
 
काट्यात काटा गुलाबाचा काटा,
......... हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता
 
आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,
मात्र आमच्या ......... चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
 
काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
......... चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून
 
हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
......... ला देतो जिलेबीचा घास
 
चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
.........चं नाव घेतो देवापुढे.
 
दही, साखर, तूप,
......... ही मला आवडतेत खूप
 
मंद आहे वारा संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो ......... आणि माझी जोडी
 
एका वर्षात असतात महिने बारा,
......... च्या नावात समावलाय आनंद सारा
 
मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
........ च्या स्पर्शाने उमटले झंकार
 
*********************** 
 
मराठी विनोदी उखाणे Funny Marathi Ukhane
 
स्वयंपाक येत नाही म्हणून ......... राव माझ्यावर रागावले,
मग काय पहिल्याच दिवशी जेवण मी स्विगीहून मागवले
 
बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू
......... राव दिसतात साधे, पण आहेत खूप चालू
 
साखरेचे पोते सुईने उसवले,
......... ने मला पावडर लाऊन फसवले
 
पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,
आमचे ......... आहेत फारच नाजूक
 
भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
......... रावांच्या जीवावर मी करते फारच मज्जा 
 
बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
......... रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड
 
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
......... भाव देत नव्हते आधीही केले होते खूप ट्राय
 
खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,
......... माझी मांजर आणि मी तिचा बोका.
 
आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
......... रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा
 
हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि .........  किती टिंगू
 
केळीचं पान टरटर फाटतं,
......... ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं
 
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि ......... लावतील कुकर.
 
......... पण आहे सुंदर ती पण आहे छान
कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान. 
 
लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,
तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते
 
कॉलेजमध्ये असताना होते मी .........  दिवानी,
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.
 
काल होती फ्रायडे नाईट,
करून आले मी पार्टी,
......... यांनी दिलं मला लिंबूपाणी,
कारण नवरा माझा स्मार्टी.
 
श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या ......... आवडतो गरमगरम बटाटेवडा. 
 
तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला ......... खाल्ला जास्तच भाव.