शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By आय. वेंकटेश्वर राव|

तिरूपती बालाजी मंदिर

वेंकटरमणा... गोविंदा...गोविंदा...

कौशल्या सुप्रजा राम। पूर्व संध्या प्रवर्तते, उठीस्ता। नरसारदुला।

WDWD
तिरूपती पर्वतावर वसलेले श्री बालाजी मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. यावेळी धर्मयात्रेत आम्ही या मंदिराचा महिमा आपणासमोर मांडत आहोत. दरवर्षी लाखो भाविक बालाजीच्या दर्शनासाठी येत असतात. जगातील श्रीमंत धार्मिक स्थळांमध्ये या मंदिराचा उल्लेख केला जातो.

बालाजी नेमके कोण?
श्री व्यंकटेश्वराला अर्थात बालाजीला विष्णूचा अवतार मानले जाते. विष्णूने काही काळ एका तलावाच्या (पुष्करणी) किनार्‍यावर वास्तव्य केले होते. हा तलाव तिरूमलाजवळ आहे. तिरूमला-तिरूपतीच्या चारही बाजूंनी असलेल्या सप्तगिरी नावाच्या टेकडीवर श्री व्यंकटेश्वरैयाचे मंदिर आहे. अकराव्या शतकात संत रामानुजन तिरूपतीच्या टेकडीवर गेले होते. तेथे प्रभू श्रीनिवास (व्यंकटेश्वराचे दुसरे नाव) त्यांच्यासमोर प्रकटले आणि त्यांनी रामानुज यांना आशीर्वाद दिले. प्रभूच्या आशीर्वादानंनंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यंकटेश्वराच्या सेवेस वाहून घेतले. वैकुंठ एकादशीला भाविक येथे मोठ्या प्रमाणात येतात. येथील दर्शनामुळे पाप व जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

मंदिराचा इतिहास
मंदिराचा इतिहास नवव्या शतकापर्यंत पोहचतो. यावेळेस कांचीपुरमचे पल्लव राजांच्या अधिकारात हा प्रदेश होता. विजयनगरच्या साम्राज्यकाळातही हे मंदिर विशेष प्रसिद्ध नव्हते. पंधराव्या शतकानंतर मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली. इसवी सन १८४३ ते १९३३ दरम्यान इंग्रज राजवटीत मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हातीरामजी मठाच्या महतांनी सांभाळली.

१९३३ मध्ये मद्रास सरकारने व्यवस्थापन आपल्याकडे घेऊन तिरूमला-तिरूपती या स्वतंत्र व्यवस्थापन समितीस व्यवस्थापनाचे अधिकार देण्यात आले. आंध्र प्रदेशच्या स्थापनेनंतर समितीची पुनर्स्थापना होऊन प्रशासकीय अधिकार्‍याची सरकारचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली.

मुख्य मंदिर -
श्री व्यंकटेश्वराचे हे पवित्र व प्राची
WDWD
वेंकटाद्री नावाच्या पर्वताच्या सातव्या शिखरावर आहे. श्री स्वामी नावाच्या पुष्करणीजवळ हे मंदिर आहे. सर्व धर्मांच्या लोकांसाठी हे मंदिर खुले आहे.

पौराणिक ग्रंथांनुसार कलियुगात मुक्ती मिळविण्यासाठी श्री व्यंकटेश्वराच्या आशीर्वाद प्राप्त करणे गरजेचे आहे. रोज पन्नास हजारांहून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. या टेकडीवर चढण्यासाठी विशेष मार्ग बनविण्यात आला आहे.
WDWD
केशदान -
भाविक श्रींच्या चरणी आपले केस समर्पित करून आपल्यातील गर्व इश्वरचरणी समर्पित करतात. पूर्वीच्या काळी हे काम नाभिकांकरवी घरातच केले जायचे. मात्र आता मंदिराजवळ 'कल्याण कट्टा' या स्थळी सामूहिकरीत्या क्षौर केले जाते. केशदानानंतर येथेच स्नान करून पुष्करणीत स्नान करतात. त्यानंतरच मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातात.

सर्वदर्शन
सर्वदर्शनम याचा अर्थ 'सगळ्यांसाठी दर्शन' असा आहे. यासाठी वैकुंठ कॉम्प्लेक्स हे प्रवेश द्वार आहे. तिकिट घेण्यासाठी इथे संगणकीकृत व्यवस्था आहे. नि:शुल्क दर्शनाची देखील व्यवस्था आहे. यासोबतच अपंगांसाठी 'महाद्वारम' मुख्य द्वार प्रवेशाची व्यवस्था आहे.

प्रसा
तीर्थ, गोड पोंगल, दही-भाताचा प्रसाद भाविकांना दर्शनानंतर दिले जातो.

लाड
श्री चरणी प्रसाद चढविण्यासाठी पनयारम म्हणजेच लाडू मंदिराच्या बाहेर मिळतात. दर्शनानंतर भाविक मंदिर परिसराबाहेर लाडू खरेदी करू शकतात.

ब्रह्मोत्स
ब्रह्मोत्सव तिरूपतीचा प्रमुख उत्सव असून तो वर्षातून एकदा साजरा केला जातो. नऊ दिवस चालणार्‍या या पर्वास सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्यावर सुरूवात होते. यासोबतच इथे वसंतोत्सव, तपोत्सव, पवित्रोत्सव व अधिका हे उत्सवही साजरे केले जातात.

विवाह संस्का
येथे एक 'पुरोहित संघ' आहे. तेथे ठिकाणी विविध संस्कार केले जातात. विवाह संस्कार, नामकरण विधी, उपनयन संस्कार हे विधी केले जातात. हे सर्व संस्कार उत्तर आणि दक्षिण भारतीय प्रथेनुसार पार पडतात.

राहण्याची व्यवस्थ
येथे राहण्याची उत्तम व्यवस्था आह
WDWD
. परवडेल अशा दरात हॉटेल, धर्मशाळा आहेत. त्यासाठी येथील केंद्रीय कार्यालयात आधी बुकींग करावे लागते.

कसे पोहोचाल?
तिरूपती चेन्नईपासून एकशे तीस किलोमीटरवर आहे. येथून हैदराबाद, बंगलोर आणि चेन्नईसाठी बस व रेल्वेसेवा उपलब्ध आहे. तिरूपतीला एक लहान विमानतळ असून मंगळवार व शनिवारी हैदराबादहून विमान येते.