बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. प्रजासत्ताक दिन
Written By वेबदुनिया|

राष्ट्रभक्ती

- अनंत बावने

जागवावी राष्ट्रभक्ती
तनमनातूनी अपुल्या ।।
जागजागी गात जावे,
गीत राष्ट्राचेच अपुल्या...

राष्ट्राभिमान अमुचा
हीच खरी राष्ट्रभक्ती ।।
नसानसातून उसळू द्यावी,
राष्ट्रप्रीती, राष्ट्रशक्ती...

गौरवाया राष्ट्र अपुल्या
प्रेम राष्ट्रावर करूया ।।
तळपत्या राष्ट्रात अपुल्या,
गान राष्ट्राचे, गाऊ या.....

उंच नेऊ राष्ट्र अपुले
मान अपुली उंचवूनी ।।
चढवू राष्ट्र गौरवास,
राष्ट्रप्रेम, जागऊनी....

देश, समाज, संस्कृती
परंपरा, चालीरीती ।।
देशासाठी जगायचे
हीच खरी संपत्ती.....