शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे आसन प्रभावी

pregnant
आज आम्ही गर्भवती होण्याची इच्छा बाळगत असलेल्या महिलांसाठी आवश्यक माहिती देत आहोत. फॅमिली प्लानिंग करत असलेल्या महिलांनी प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी काही योगासने केली पाहिजेत ज्याने गर्भधारणेची शक्यता वाढते. निरोगी शरीर आणि शांत मन असल्याने गर्भवती होण्याची शक्यता वाढते. योग मुद्रा प्रजनन क्षमता वाढविण्याचा योग्य पर्याय आहे. याने शरीर मजबूत होतं आणि मानसिक स्तर देखील संतुलित राहतं.
 
भ्रामरी प्राणायाम केल्याने ताण दूर होतो. मन शातं असल्यास गर्भधारणेत मदत होते.
 
बद्धकोणासन याला फुलपाखरु नावाने देखील ओळखतात. याने आंतरिक मांड्या, जननांग, कूल्हे आणि गुडघ्यांच्या स्नायूंमध्ये लवचिकता जाणवते.
 
बालासन ताण दूर करण्यास आणि रक्त प्रवाह सुरळीत करण्यात मदत करतं जे प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे. हे आसन रिकाम्या पोटी करावे किंवा भोजनाच्या किमान चार ते सहा तासानंतर करावं.
 
उत्तानासन प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खूप प्रभावी असल्याचं समजलं जातं. याने पेशींमध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो व मेंदूही स्वस्थ राहतो. याने हार्मोनल संतुलन नियंत्रित राहते.
 
मार्जरी आसनमध्ये मांजरीसारखे बसतात. हे केल्याने रीढची हाडे आणि पोटात गरमपणा जाणवतो.
 
विपरीता–करणी आसनामुळे आपल्या शरीरावर वृद्धत्व विरोधी प्रभाव जाणवतो आणि पेल्विक क्षेत्रामध्ये रक्त प्रवाह सुधार होतो. संबंध स्थापित केल्यावर या मुद्रेत आराम केल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते.