शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

सेन्सेक्सची 21 हजारांवर भरारी, 2010 नंतर पहिल्यांदाच उच्चांक

WD
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने आज (गुरुवारी) सकाळच्या सत्रातच 21000 चा उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबर 2010 नंतर ही पहिल्यांदाच बाजाराने सगळ्यात मोठी उसळी घेतली आहे. सकाळच्या सत्रात खरेदीदारांमध्ये असलेल्या उत्साहाने सेन्सेक्समध्ये 200 अंकाची भर पडली.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीमध्येही एक टक्क्याची सुधारणा झाली. निफ्टीनेही नोव्हेंबर 2010 नंतर पहिल्यांदाच 6243 ही पातळी गाठली आहे. यंदाचा सेन्सेक्स आणि निफ्टीचा हा उच्चांक आहे.

गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये 126 अंकांची घसरण झाली होती. मात्र आज सकाळी दहा वाजेच्या आसपास 200 अंकांची वाढ होऊन सेन्सेक्स 21013 वर पोहोचला.