बुधवार, 5 ऑक्टोबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Updated: शनिवार, 16 जुलै 2022 (16:10 IST)

आपल्या आई वडिलांचं घर.....

हे एक असं घर असतं जिथे तुम्ही निमंत्रणा शिवाय शंभर वेळा जाऊ शकता.
हे घर असं असतं जिथे चावी लावून बिनदिक्कत तुम्ही प्रवेश करू शकता.
हे एक असं घर असतं जे दाराकडे डोळे लावून तुमची वाट बघत बसलेलं असतं.
हे एक असं घर असतं जे तुम्हाला तुमच्या बिनधास्त फुलपाखरू दिवसांची आठवण करून देतं, तुमच्या आनंदी लहानपणाची आणि खंबीर आधाराची आठवण करून देतं.
हे एक असं घर असतं जिथे तुमच्या आई वडिलांना तुम्ही पाहिलं की तुम्हाला केवळ परमानंद मिळतो आणि त्यांच्या बरोबरचा संवाद एखाद्या पारितोषिकासारखा.
हे घर असं असतं जिथे तुम्ही गेला नाहीत तर घरातल्या त्या माणसांचं मन कोमेजून जातं.
हे घर असं असतं ज्या घराने तुमच्यासाठी एक दिवा लावलेला असतो ज्यामुळे तुमचं जगणं उजळून निघतं, तुमचं आयुष्य हर्ष आणि उल्हासाने भरून जातं.
हे घर असं असतं जिथली जेवणाची बैठक केवळ तुमच्यासाठी असते, तिथे कुठलाही दिखाऊ उपचार नसतो.
हे घर असं असतं जिथे जेवणाच्या वेळी तुम्ही आलात आणि चार घास खाल्ले नाहीत तर ते कष्टी होतं, मनातून खट्टू होऊन जातं.
हे घर असं असतं जे तुम्हाला भरभरून आनंद देतं आणि मनमुराद हसवतं सुद्धा.
मुलांनो, खूप उशीर होण्याआधी या घराचं मोल ओळखा.
खूप सुदैवी असतात ती माणसं ज्यांच्याकडे, जाण्यासाठी त्यांच्या आईवडिलांची घरं असतात...
 
- सोशल मीडिया