मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (14:23 IST)

Ganesh Chaturthi Special pohe Laddoo Recipe : गणेश चतुर्थीला बाप्पाला पोह्याचे लाडू बनवा, रेसिपी जाणून घ्या

आराध्य दैवत गणपतीचा मोठा सण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देशभरात गणपती बाप्पाच्या या उत्सवाची धुमाकूळ पाहायला मिळत आहे.घरोघरी  गणपतीची प्रतिष्ठापना करून त्यांची विशेष सेवा, पूजा केली जाते. गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक बनवतात. यंदा आपण पोह्यांचे लाडू देखील नैवेद्य म्हणून बाप्पाला अर्पण करू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
दोन वाट्या पातळ पोहे ,पाव चमचा वेलची पूड, गूळ, दोन मोठे चमचे साजूक तूप, अर्धी वाटी दूध, काजू आणि पिस्ते बारीक चिरून, किसलेले खोबरे किंवा खोबरे पूड.
 
कृती- 
सर्व प्रथम कढईत साजूक तूप घालून खोबरे भाजून घ्या. नंतर त्याच कढईत खोबरे काढून पोहे तळून घ्यावेत. पोहे तळण्यासाठी साजूक तूप घालून मंद आचेवर तळून घ्या. पोहे बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवा. आता तळलेले पोहे मिक्सरच्या भांड्यात टाका. नारळ पावडर, वेलची पूड, गूळ घालून एकत्र करा. आता कढईत साजूक  तूप टाकून गॅसवर गरम करा. हे तूप खूप गरम झाल्यावर गॅस बंद करा. आता या पातेल्यात पोह्याचे मिश्रण टाकून चांगले मिसळा. नंतर या पोह्यात दूध आणि बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घाला. हाताच्या मदतीने लाडू तयार करा. इच्छा असल्यास तुम्ही नारळाच्या किस वर लाडू गुंडाळू शकता. स्वादिष्ट पोह्यांचे लाडू तयार. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला लाडवाचा नैवेद्य दाखवा.