शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

ताजमध्ये अजूनही चकमक सुरूच

दोन दहशतवादी लपल्याचा संशय,मिडीयावरही गोळीबार

दोन दिवस उलटले तरी मुंबईतील दहशतवाद्यांचे भय संपलेले नसून अजूनही हॉटेल ताजमध्ये स्फोट आणि चकमक सुरू आहे. ताजमध्ये रात्रभर गोळीबार सुरू असून सकाळी एका खोलीस मोठी आग लागली. कमांडोंनी विळखा कसला असून लवकरच दहशतवाद्यांचा हा खेळ संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी एनएसजीच्या कमांडोंनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू ठेवलेले ऑपरेशन अजूनही संपलेले नाही. ताज हॉटेलमधील कारवाई संपल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा ग्रॅनाइट स्फोट झाल्याने कमांडोंनी आपली कारवाई अधिक तिव्र केली. कमांडोच्या आणखी काही तुकड्या हॉटेलमध्ये शिरल्या असून दहशतवादी आणि कमांडोमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. या चकमकीचा फटका मिडीयच्या प्रतिनिधींनाही बसला. शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी दोन वेळा मिडीयाच्या प्रतिनिधींवर गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रसिध्दीचा अतिरेक करणा-या या प्रतिनिधींना परीसरातून हटकण्यात आले आहे.

कमांडोंना हॉटेलताजमधील सुमारे 300 खोल्यांचा तपास करायचा आहे. अजूनही हॉटेमध्ये काही पर्यटक असण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक कारवाई करावी लागत असल्याने अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच सकाळी पावसाच्या तुरळक सरी पडत असल्याने अडथळे वाढत आहेत.