शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (16:03 IST)

महाराष्‍ट्रासाठी आता खास कमांडोः मुख्‍यमंत्री

दहशतवादी कारवाया हाणून पाडण्‍यासाठी एनएसजीप्रमाणे आता महाराष्‍ट्रासाठी खास प्रशिक्षित कमांडोंचे पथक तयार करणार असून एटीएसला आणखी अत्‍याधुनिक करणार असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी सांगितले, की दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले एनएसजीचे जवान व पोलीस कर्मचा-यांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी 25 लाख रुपयांची मदत राज्‍य सरकार करणार असून त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी घरे उभी करून दिली जाणार आहे.या ऑपरेशनमध्‍ये सहभागी झालेल्‍या राज्‍य पोलीस दलातील जवानांनाही वेतन वृध्‍दी दिली जाणार असल्‍याचे विलासराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.