शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: इस्लामाबाद , सोमवार, 3 मे 2010 (15:51 IST)

आयएसआय प्रमुख पाशा भारतात येणार नाहीत

मुंबईवरील हल्ल्याच्या तपासात मदत करण्यासाठी पाकिस्तान आपल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्स (आयएसआय) या संघटनेच्या प्रमुख पाशा यांना पाठवणार नाही. तर त्याऐवजी दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविणार आहे. येथील पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.

या हल्ल्ल्यात पाकिस्तानी हस्तकांचा हात असल्याचा संशय भारताने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पाकचे अध्यक्ष असीफ झरदारी यांना फोन करून त्यांच्या आयएसआयच्या प्रमुखांना भारतात तपासाला मदत करण्यासाठी पाठविण्याची विनंती केली होती. झरदारी यांनी ही विनंती मान्य केली. पण त्यानंतर आयएसआय प्रमुखांना न पाठवता, दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.