शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

हल्यामागील पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आव्हान कमांडोंनी तितक्याच धाडसाने पार पाडल्यानंतर आता या हल्यामागील पारेमुळे खणून काढण्याचे आव्हान सरकारपुढे आले आहे.

मुंबईत ‍तीन दिवस चाललेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्याने सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान उभे केले होते. दहशतवाद्यांनी हॉटेललचा आसरा घेतल्याने त्यातील पर्यटकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्‍याचे आव्हानच कमांडोंसमोर होते. त्यामुळे कारवाई लांबली असली तरी अखेर मोठ्या धाडसाने कमांडोंनी दहशतवाद्यांचा मुकाबला करून त्यांना कंठस्नान घातले आणि दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबई वाचवली.

दहशतवाद्यांचा धोका टळला असला तरी या हल्यामागे कुणाचा हात होता याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. मुंबईत झालेला हा हल्ला आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि धोकादायक होता. तीन दिवस दहशतवाद करण्याइतपत स्फोटके घेऊन दहशतवादी मुंबईत आलेच कसे? याची चौकशी होण्यापासून ते दहशतवाद्यांचा तपास करून चोख प्रतिउत्तर द्यावे लागणार आहे. या हल्यामध्ये धाडसी पोलिस अधिका-यांसह तिनशेहून अधिक निष्पापांचा बळी गेला आहे याशिवाय राज्याच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आता ठोस पावले उचलली नाहीत तर सामान्य नागरिकांच्या तिव्र संतापाला समोरे जावे लागणार आहे.