शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (13:49 IST)

मुंबईतील 'या 'रुग्णालयात आढळले 130 वर्ष जुनं भुयार!

मुंबईच्या जेजे रुग्णालयात 130 वर्ष जुने भुयार आढळले आहे. हे भुयार ब्रिटिश काळातील बांधलेली असल्याचे समजले आहे. भुयार सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रिटिश काळातील हे भुयार डिलिव्हरी वार्ड ते चिल्ड्रन वार्ड पर्यंतचे आहे. ही भुयार रुग्णालयाच्या परिसराची नियमित पाहणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड यांना बुधवारी पाहणी करताना आढळली. पाहणी करताना डॉ राठोड यांना नर्सिंग कॉलेज जवळ काहीतरी असल्याचा संशय आला त्यांनी झाकण उघडल्यावर त्यांना लांब पोकळ भाग दिसला त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावूंन त्या भागाची पाहणी केली असता त्यांना हे भुयार आढळले. त्यांनी जेजे रुग्णालयाला कळविले. जेजे रुग्णालयाने स्थानिक प्रशासन आणि आर्कियॉलॉजी डिपार्टमेंटला आणि मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना या भुयारची माहिती दिली.
 
 Edited by - Priya Dixit